मुंबई - मान्सून अखेर मुंबईत दाखल ( Monsoon finally arrives in Mumbai ) झाला असून सध्या मुंबईत पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. गुरुवारीही मुंबईतील अनेक भागात जोरदार पाऊस ( Heavy rains in many parts of Mumbai ) झाला. विशेष म्हणजे दादर, वांद्रे, मुंबईच्या उपनगरात मुसळधार पावसाची नोंद ( Heavy rains recorded ) झाली. तर, दुसरीकडे पावसामुळे मुंबईकरांना कडाक्याच्या उन्हापासून दिलासा ( Relief from the scorching sun ) मिळाला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मुंबईत आजही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर पुढील आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ( Chance of torrential rain ) आहे.
मुंबईकरांची तारांबळ - मुंबईच्या दादर परिसरात नेहमीच माणसांची वर्दळ असते. त्यात आज सकाळपासूनच ऊन पडलेलं होते. त्यात अचानक पावसाची सुरुवात झाल्याने दादरच्या शिवाजी पार्क परिसरात व्यायामासाठी येणाऱ्या अनेकांची तारांबळ उडाली. इथे व्यायाम करणाऱ्या बरोबरच अनेक जण सावलीत निवांत बसण्यासाठी देखील आलेले असतात. तसेच याच परिसरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील निवासस्थान असल्याने येथे अनेक मनसेच्या कार्यकर्त्यांची देखील वर्दळ असते. अचानक आलेल्या पावसामुळे या सर्वांची तारांबळ उडाली व सर्वांनी झाडांच्या आडोशाचा आधार घेतला.
19 जून नंतर मुसळधार पाऊस - हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, 17 जून रोजी मुंबईत आकाश ढगाळ राहील. मधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. त्याचवेळी पावसामुळे तापमानात घट नोंदवली जात आहे. आज मुंबईचे किमान तापमान 24 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. विभागानुसार 18 जूनपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असून 19 जूननंतर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे पाणी तुंबण्याचीही शक्यता आहे.
यलो अलर्ट जारी- 18 जूनपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार आहे. 20 जूनपासून राज्यभर मुसळधार पाऊस पडणार आहे. मुंबई हवामान खात्याने 20 जून रोजी मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी यलो अलर्ट तर, कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 20 जूनपासून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.