ETV Bharat / city

Mohit Kambhoj Vs Nawab Malik : नवाब मलिकांची ड्रग्ज टेस्ट करावी; भाजपा नेते मोहित कंबोज यांची मागणी

नवाब मलिक हे 'ईडी' कोठडीत असताना त्यांची अचानक तब्येत खराब ( Nawab Malik In JJ Hospital ) झाल्याने त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आता यावरच भाजप नेते मोहित कंबोज ( Mohit Kambhoj Alligation On Nawab Malik ) यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधत नवाब मलिक यांची ड्रग्ज टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी कंबोज यांनी ईडीकडे केली आहे.

Nawab Malik In JJ Hospital
Nawab Malik In JJ Hospital
author img

By

Published : Feb 27, 2022, 4:14 PM IST

Updated : Feb 27, 2022, 4:51 PM IST

मुंबई - अल्पसंख्यांक व विकास मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक ( NCP Leader Nawab Malik ED Custody ) यांना मनी लाँडरिंग प्रकरणात ई़डीने अटक केली आहे. नवाब मलिक हे ईडी कोठडीत असताना त्यांची अचानक तब्येत खराब ( Nawab Malik In JJ Hospital ) झाल्याने त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आता यावरच भाजप नेते मोहित कंबोज ( Mohit Kambhoj Alligation On Nawab Malik ) यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधत नवाब मलिक यांची ड्रग्ज टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी कंबोज यांनी ईडीकडे केली आहे.

प्रतिक्रिया

'नवाब मलिकांची नक्की तब्येत कशामुळे बिघडली?' -

नवाब मलिक ईडीच्या कोठडीत असून त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवाब मलिकांनी तब्येत ड्रग्ज न मिळाल्यामुळे बिघडली असल्याचा आरोप भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. मलिकांची केंद्रीय तपास यंत्रणांनी ड्रग्ज टेस्ट करावी, जेणेकरुन त्यांच्या अहवालात तब्येत बिघडल्याचे खर कारण समोर येईल, असा टोला भाजप नेते मोहित कंबोज यांनी लगावला आहे. नवाब मलिकांना हर्बल तंबाकू आणि गांजा न मिळाल्यामुळे अस्वस्थ झाले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिकांना रुग्णलायात दाखल केल्यावरुन निशाणा साधला आहे. नवाब मलिकांची नक्की तब्येत कशामुळे बिघडली? असा सवाल मोहित कंबोज यांनी केला आहे. मोहित कंबोज यांनी ट्विट करत मलिकांची ड्रग्ज टेस्ट करावी, अशी विनंती केली आहे. नवाब मलिकांची तब्येत बिघडली आहे. हम झुकेंगे लेकिन हम पीटेंगे जरूर आणि आता बहाना करुन रुग्णालयात दाखल झाले आहेत. कोण म्हणतंय नवाब मलिकांची तब्येत बिघडले ते घाबरले आहेत. प्रचंड तणावात आहेत, असेही ते म्हणाले.

'नवाब मलिक हे ड्रग्ज पेडलर्सचे प्रवक्ते' -

नवाब मलिक यांना अटक होण्याच्या एक दिवस पूर्वी बलियावरुन घरी परतले होते. ते सकाळी घरी होते, जेव्हा ईडीने त्यांना ताब्यात घेतलं. नवाब मलिक रोज हर्बल तम्बाकू खातात. गांजाशिवाय नवाब मलिकांची झोप उडत नाही. कोणालाही विचारले तर सांगतील नवाब मलिक रोज गांजा ओढतात. गांजा न मिळाल्यामुळे त्यांच्यातील लक्षणे दिसू लागली आणि ते घाबरत आहेत. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. माझी विनंती आहे की जेजे रुग्णलायातील डॉक्टरांशी आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी नवाब मलिकांची ड्रग्ज टेस्ट करावी. नवाब मलिकांचा अहवाल जाहीर करावा. नवाब मलिक हे ड्रग्ज पेडलर्सचे प्रवक्ते असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना तब्येत बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मलिकांना यूरोलॉजी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. किडनीमध्ये दुखत असल्यामुळे मलिकांना रुग्णलायात दाखल करण्यात आलय. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार नवाब मलिकांची दोन वेळा किडनीची सर्जरी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माहिती देण्यात आली आहे की नवाब मलिकांवर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नवाब मलिकांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. शुक्रवारी त्यांना नियमित तपासासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते, परंतु त्यांना रुग्णलयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

'शाब्दिक लढाई अद्यापही सुरू' -

बॉलिवूडचा शहेनशहा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यापासून नवाब मलिक आणि मोहित कंबोज यांच्यात शाब्दिक एकमेकांवर वार सुरू आहे. ड्रग्ज प्रकरणात मोहित कंबोज यांच्या नातेवाईकाचे नाव नवाब मलिक यांनी घेतल्यानंतर मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात मानहानीचा खटला देखील दाखल केला आहे. तेव्हापासून सुरू झालेले ही शाब्दिक लढाई अद्यापही सुरू आहे.

हेही वाचा - Fir Against Narayan rane : दिशा सालियनची बदनामी भोवली, राणे पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल

Last Updated : Feb 27, 2022, 4:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.