ETV Bharat / city

Mohit Kambhoj Pitition : शिवडी न्यायालय गर्दीप्रकरणी नवाब मालिकांवर गुन्हा दाखल करा; मोहित कंभोज यांची याचिका

शिवडी न्यायालयासमोर जमवलेल्या गर्दी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक ( NCP Leader Nawab Malik ) त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी याचिका भाजपा नेते मोहित कंभोज (BJP Leader Mohit Kambhoj ) यांनी दाखल केली होती. याप्रकरणी ४ फेब्रुवारी ( Mohit Kambhoj Petition On Nawab Malik ) रोजी सुनावणी होणार आहे.

nawab malik
mahit kambhoj
author img

By

Published : Jan 25, 2022, 4:21 PM IST

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक ( NCP Leader Nawab Malik ) यांनी शिवडी न्यायालयासमोर जमवलेल्या गर्दी प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशा प्रकारची याचिका शिवडी न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याची याचिका भाजपा नेते मोहित कंभोज (BJP Leader Mohit Kambhoj ) यांनी दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. मात्र हे प्रकरण आज तहकूब करण्यात आले असून पुढील सुनावणी 4 फेब्रुवारीरोजी होणार आहे.

काय आहे याचिका -

मोहित कंबोज यांच्या याचिकेनुसार नवाब मलिक यांनी 29 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान मोठ्या प्रमाणात समर्थक गोळा केले होते. याप्रकरणी नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी याचिका मोहित कंबोज यांनी दाखल केली होती. नवाब मलिक यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केले असल्याचे कंबोज यांनी याचिकेत म्हटले होते. दरम्यान आम्ही या संदर्भात पोलिसांत तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी आमची दखल घेतली नाही. त्यामुळे नवाब मलिकांवर गुन्हा डफडाखाल करण्यात यावा, अशी याचिका आम्ही दाखल केली असल्याचे कंबोज यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.