ETV Bharat / city

मालाड इमारत दुर्घटनेत एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू; दूध आणायला गेलेले रफी बचावले - मालाड इमारत दुर्घटना

मालाडच्या मालवणी भागात एका रहिवाशी भागात तीन मजली इमारत शेजारील घरावर कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत.

malad residential building collapse
मालाड इमारत दुर्घटना
author img

By

Published : Jun 10, 2021, 9:14 PM IST

Updated : Jun 10, 2021, 10:34 PM IST

मुंबई - मालाडच्या मालवणी भागात एका रहिवाशी भागात तीन मजली इमारत शेजारील घरावर कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. मालाडमधील मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

माहिती देताना मोहम्मद रफी आणि रुबिना शेख

हेही वाचा - एन ९५ मास्कहून अधिक प्रभावी असलेल्या नॅनॉटेक मास्कची निर्मिती- सिंगापूर विद्यापीठ

  • एकाच घरातील नऊ जणांचा मृत्यू

या इमारतमीमध्ये राहणाऱ्या मोहम्मद रफी याचं संपूर्ण कुटुंबच संपलं आहे. यात रफी यांचे 2 मुलं, 4 लहान मुली, भावाची पत्नी आणि रफी यांची पत्नी व आणखी एक व्यक्ती या सगळ्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. दूध आणण्यासाठी घराच्या बाहेर पडलेले रफी जेव्हा घरी परतले तेव्हा संपूर्ण घर उद्धवस्थ झाल्याचं रफी यांनी पाहिलं.

  • रुबिना शेख यांच्या घरावरचं छत गेलं-

रुबिना शेख या दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या शेजारील घरामध्ये राहात होत्या. रात्रीच्या सुमारास मी जेवण बनवत होते असं त्या सांगतात. घरामध्ये त्यावेळी कुणीच नव्हतं, दोन मुलं आहेत मला मात्र रात्रीच्या वेळी ती मुलं घराच्या बाहेर होती. रात्री अचानक आवाज आला. घरावर काही दगडं पडले आणि क्षणात संपूर्ण छत कोसळलं. माझ्या घरी कमवणारं कुणी नाही. मी एक विधवा महिला आहे. कोरोनामुळं घरी कुणीही कमवणारं नाही. मुलांची नोकरी देखील कोरोनामुळं गेली आहे. या दुर्घटनेत छातीला मार लागल्यानं फार बोलताही येत नाही. मी स्वत: भीक मागून जीवन जगत आहे. अशा वेऴेस माझ्या डोक्यावरचं छत गेलं आहे. मला हे छत पुन्हा मिळवून द्यावं, अशी भावना रुबिना यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - आम्ही मृत्यूचे कोणतेही आकडे लपवले नाही; सरकार पारदर्शकपणे काम करते आहे - राजेश टोपे

Last Updated : Jun 10, 2021, 10:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.