ETV Bharat / city

Shivsena - MNS Banner War : शिवसेनेच्या बॅनरवर मनसेचा पलटवार, उद्धव ठाकरे यांची मांडली बदलती भूमिका

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या सततच्या बदलत्या भूमिका दाखवत शिवसेना भवनासमोर राज ठाकरे यांचा मुस्लिम वेशातील बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवर काल, आज आणि उद्या? असं शीर्षक देण्यात आले होते. शिवसेनेच्या या बॅनरला आता मनसेकडून बॅनर लावून उत्तर देण्यात आले आहे.

शिवसेना भवनासमोर लावलेले बॅनर
शिवसेना भवनासमोर लावलेले बॅनर
author img

By

Published : Apr 15, 2022, 12:45 PM IST

Updated : Apr 15, 2022, 1:07 PM IST

मुंबई - मनसे विरुद्ध शिवसेना वाद दिवसेंदिवस टोकाला पोहोचत चालला आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या सततच्या बदलत्या भूमिका दाखवत शिवसेना भवनासमोर राज ठाकरे यांचे मुस्लिम वेशातील बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवर काल, आज आणि उद्या? असं शीर्षक देण्यात आले होते. शिवसेनेच्या या बॅनरला आता मनसेकडून बॅनर लावून उत्तर देण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भूमिका दाखवल्या - मनसे नेते संतोष यांनी लावलेल्या या बॅनर मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बदलत्या भूमिका मांडल्या आहेत. यात त्यांनी शिवसेना-भाजप युती असतानाचे उद्धव ठाकरे व आता महाविकासआघाडी झाल्यानंतर शरद पवार व सोनिया गांधी यांच्याशी मित्रत्वाचे संबंध असलेले उद्धव ठाकरे असे फोटो लावले आहेत. या बॅनरवर संतोष यांनी काल आज उद्या? असं शीर्षक दिलं आहे.

हेही वाचा - Villagers Killed by Naxals : गडचिरोलीत दोन गावकऱ्यांची नक्षलवाद्यांकडून हत्या; एका नक्षलीचे आत्मसमर्पण

आम्ही लवंडे नाही - मनसे नेते संतोष म्हणाले की, "आम्ही लवंडे नाही. आम्ही राज ठाकरे यांचे मर्द मावळे आहोत. आम्ही रात्रीच्या अंधारात बॅनर लावत नाही. मर्दासारखे दिवसाढवळ्या बॅनर लावतो. यांनी हिंदुत्व सोडलं पण आम्ही नाही. आमची सुरुवातीपासून जी भूमिका आहे आज देखील तीच हिंदुत्वाची भूमिका आहे. आम्ही सतत भूमिका बदलणारे लवांडे नाही. आम्ही मर्द आहोत." दरम्यान, सध्या हिंदुत्वाचा मार्ग घेतलेले राज ठाकरे आता पुण्यात कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असून पुण्यात हनुमान चालीसा पठणाचा मनसेकडून मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आपली बदललेली भूमिका कार्यकर्त्यांना पटवून देण्यात राज ठाकरे किती यशस्वी होतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Last Updated : Apr 15, 2022, 1:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.