ETV Bharat / city

'महाराष्ट्रात आमची भाषा मान्य नाही; तर आम्हाला अमेझॉन मान्य नाही', मनसेचा इशारा

author img

By

Published : Dec 18, 2020, 5:30 PM IST

अमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीच्या अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश असावा, अशी मागणी मनसेने केली आहे. मात्र कंपनीने हे शक्य नसल्याचे सांगितले, आणि मनसे विरुद्ध अमेझॉन अशी लढाई सुरू झाली. मनसेने देखील आक्रमक होत मराठी नाही, तर अमेझॉन नाही, अशी मोहीम सुरू केली आहे. मनसेच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मोहीम सुरू राहणार असल्याचे अखिल चित्रे यांनी सांगितले.

MNS on amazon
'महाराष्ट्रात आमची भाषा मान्य नाही; तर आम्हाला अमेझॉन मान्य नाही', मनसेचा इशारा

मुंबई - अमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीच्या अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश असावा, अशी मागणी मनसेने केली आहे. मात्र कंपनीने हे शक्य नसल्याचे सांगितले, आणि मनसे विरुद्ध अमेझॉन अशी लढाई सुरू झाली. मनसेने देखील आक्रमक होत मराठी नाही, तर अमेझॉन नाही, अशी मोहीम सुरू केली आहे. मनसेच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मोहीम सुरू राहणार असल्याचे अखिल चित्रे यांनी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठीच्या विषयावर पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. ई-कॉमर्स कंपनीच्या अॅपमध्ये मराठीचा समावेश असावा ही मागणी करत अमेझॉन विरोधात पावलं टाकली आहेत. अमेझॉनने मराठीला स्थान द्यावे, अशी मुख्य मागणी मनसेकडून करण्यात आली. मात्र, अमेझॉन व्यवस्थापनने ते मान्य करण्यास नकार दर्शवल्याने मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी पोस्टरबाजी सुरू केली आहे. काल घाटकोपर भागातील कंपनीच्या वेअरहाऊसबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी 'तुमची डिलिव्हरी, तुमची जबाबदारी','मराठी नाही; तर अमेझॉन नाही', अशा आशयाचे पोस्टर लावले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अमेझॉन या ई-कॉमर्स शॉपिंगला त्याच्या व्यासपीठावर मराठी भाषा उपलब्ध करून द्यावी, यासाठी वारंवार पाठपुरावा केला. त्यांच्या अॅपमध्ये तामिळ, तेलगू, मल्याळम या इतर राज्यातील भाषा समाविष्ट आहेत. परंतु मराठी भाषा नाही. त्यांना सनदशीर मार्गाने वारंवार मागणी करून देखील अमेझॉनने त्यांची मुजोरी कायम ठेवली आहे. ते मराठी भाषा त्यांच्या अॅपमध्ये उपलब्ध करून देण्यास तयार नाही. त्यामुळे मनसे स्टाईलने आंदोलन करण्याची वेळ आल्याचे चित्रे यांनी सांगितले.
MNS on amazon
मनसेने देखील आक्रमक होत मराठी नाही, तर अमेझॉन नाही, अशी मोहीम सुरू केली आहे.

अमेझॉन महाराष्ट्रात व्यवसाय करत आहे. परंतु त्यांची मुजोरी काही कमी होताना दिसत नाही. आम्ही शांतपणे सर्व प्रयत्न करून बघितले. पण त्यांनी माझ्यावर आणि कार्यकर्त्यांवर विविध खटले दाखल केले. दबावतंत्राचा वापर केला. सर्वात सोप्पा मार्ग म्हणजे मराठी भाषेचा समावेश करणे, तो मात्र त्यांनी केला नाही. आता आम्ही नो मराठी नो अमेझॉन ही मोहीम सुरू केली आहे. तुम्हाला आमच्या महाराष्ट्रात आमची भाषा मान्य नाही तर आम्हाला तुम्ही मान्य नाही. आणि जोपर्यंत अमेझॉन त्यांची मुजोरी थांबवत नाही तो पर्यंत आम्ही त्यांच्या विरोधातील मोहीम सुरू ठेवणार असल्याचे चित्रे यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.