ETV Bharat / entertainment

आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ लग्नानंतर पहिल्यांदाच मुंबई विमानतळावर झाले स्पॉट, व्हिडिओ व्हायरल... - Aditi Rao Hydari and Siddharth - ADITI RAO HYDARI AND SIDDHARTH

Aditi Rao Hydari and Siddharth : आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ लग्नानंतर पहिल्यांदाच स्पॉट झाले. मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना नवविवाहित जोडप्याला पापाराझीनं आपल्या कॅमेऱ्यात कैद केलंय. आता या जोडप्याचे सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

Aditi Rao Hydari Siddharth
आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ (अदिति राव हैदरी आणि सिद्धार्थ (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 20, 2024, 12:29 PM IST

मुंबई - Aditi Rao Hydari and Siddharth: अभिनेत्री आदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ यांनी 16 सप्टेंबर 2024 रोजी तेलंगणामध्ये दक्षिण भारतीय पारंपरिक पद्धतीनं लग्नगाठ बांधली. या जोडप्याच्या लग्नाला कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळी उपस्थित होते. आदिती आणि सिद्धार्थनं त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. लग्नाच्या काही दिवसांनी नवविवाहित जोडपं मुंबईत पोहोचलं. 'लव्हबर्ड्स' आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ हातात हात घालून मुंबई विमानतळावर दिसले.

आदिती आणि सिद्धार्थचा व्हिडिओ व्हायरल : इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ मुंबई एअरपोर्टमधून बाहेर पडून कार पार्किंग एरियाकडे जाताना दिसत आहेत. यादरम्यान दोघांनी एकमेकांचा हात धरलेला होता. आदितीनं यावेळी गुलाबी सूट परिधान केला होता, यावर ती खूपच सुंदर दिसत होती. एअरपोर्टसाठी तिनं नो मेकअप लूक निवडला. आदितीनं गुलाबी सूटवर कानात सुंदर झुमके, भांगात कुंकू लावलं असून यात ती आकर्षक दिसत होती. यावेळी सिद्धार्थ निळा डेनिम शर्ट आणि काळ्या ट्राउजरमध्ये दिसला. यावर त्यानं निळ्या रंगाची टोपी घातली होती. यावेळी सिद्धार्थनं विमानतळावर आपल्या चाहत्यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर शेकहॅन्ड केलं.

आदिती आणि सिद्धार्थचं लग्न : आदिती आणि सिद्धार्थनं त्यांच्या लग्नासाठी तेलंगणातील वानापर्थी जिल्ह्यातील 400 वर्षे जुने मंदिर निवडलं होतं. आदितीच्या कुटुंबासाठी हे मंदिर खूप विशेष आहे. लग्नानंतर या जोडप्यानं त्यांच्या लग्नाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. यावर कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तू माझा सूर्य, चंद्र आणि माझे सर्व तारे आहेस. नेहमीसाठी माझा पिक्सी सोलमेट राहा... मिसेस आणि मिस्टर अदु-सिद्धू,'

अदिती आणि सिद्धार्थचा वर्कफ्रंट : आदिती शेवटची संजय लीला भन्साळी यांच्या ओटीटी वेब सीरीज 'हिरामंडी: द डायमंड बाजार'मध्ये दिसली होती. या वेब सीरीजमध्ये ती बिब्बोजनच्या भूमिकेत होती. दुसरीकडे सिद्धार्थ शेवटचा 'इंडियन 2' मध्ये कमल हासनबरोबर दिसला होता. आता पुढे तो नयनतारा आणि आर. माधवनबरोबर 'द टेस्ट'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. अदिती राव हैदरीनं बॉयफ्रेंड सिद्धार्थबरोबर बांधली लग्नगाठ, फोटो व्हायरल - Aditi tie knot with Siddharth

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.