ETV Bharat / city

'रो-रो'वरील नियमांचे राज ठाकरेंकडून उल्लंघन, भरावा लागला एक हजार रुपये दंड - राज ठाकरेंकडून बोटीवरील नियमाचे उल्लंघन बातमी

रो-रो बोटीत प्रवाशांनी धुम्रपान करु नये आणि मास्क परिधान करावा, अशी माहिती स्पीकरद्वारे देण्यात येत होती. मात्र, या दुर्लक्ष करत राज मास्क न परिधान करताच उभे होते. यावेळी त्यांनी सिगारेटही शिलगावली होती. हा प्रकार रो-रो बोटीवरील अधिकाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने राज ठाकरे यांना हे योग्य नाही तसेच बोटीवरच्या नियमाबाबत सांगितले. राज यांना आपली चूक लक्षात येताच त्यांनी दिलगिरी व्यक्त करत १००० रुपयांचा दंड भरला.

mns prsident raj thackeray had to pay a fine of rs 1000 for violating the rules on roro boat
रोरो बाटीवरील नियमांचे राज ठाकरेंकडून उल्लंघन
author img

By

Published : Sep 21, 2020, 3:47 PM IST

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे अनेक वेळा यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न करता दिसून आले होते. मात्र, त्यांची ही सवय त्यांच्या अंगलट आली आहे. मास्क परिधान न केल्यामुळे त्यांना १००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

राज हे शुक्रवारी मुंबई-मांडवा रो-रो फेरीने अलिबागला आले होते. यावेळी रो-रो बोटीत प्रवाशांनी धुम्रपान करु नये आणि मास्क परिधान करावा, अशी माहिती स्पीकरद्वारे देण्यात येत होती. मात्र, या दुर्लक्ष करत राज मास्क न परिधान करताच उभे होते. यावेळी त्यांनी सिगारेटही शिलगावली होती. हा प्रकार रो-रो बोटीवरील अधिकाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने राज ठाकरे यांना हे योग्य नाही तसेच बोटीवरच्या नियमाबाबत सांगितले. राज यांना आपली चूक लक्षात येताच त्यांनी दिलगिरी व्यक्त करत १००० रुपयांचा दंड भरल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या वरळी येथील कार्यकर्ते मनसेत प्रवेश करण्यासाठी कृष्णकुंजवर गेले होते. यावेळी अनेकजण सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन न करता दाटीवाटीने उभे होते. यामुळे एकाच ठिकाणी एवढे लोक कसे जमले, याविषयी प्रश्नचिन्हही उपस्थित करण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.