ETV Bharat / city

कोरोना लढ्यातील निवासी डॉक्टरांना मनसेकडून हायप्रोटिन्सयुक्त खाद्यपदार्थांचे वाटप - residential doctors

मनसेकडून यापूर्वी डॉक्टरांना मास्क, पीपीई किट इत्यादी वस्तूंची मदत केली आहे. रविवारी मनसेच्यावतीने निवासी डॉक्टरांना हायप्रोटिन्स युक्त खाद्यपदार्थांच्या 3500 किटचे वाटप केले.

mns-provides-protein-food-to-corona-warrior-doctors
कोरोना लढ्यातील निवासी डॉक्टरांना मनसेकडून हायप्रोटिन्सयुक्त खाद्यपदार्थांचे वाटप
author img

By

Published : May 3, 2020, 2:54 PM IST

Updated : May 3, 2020, 3:14 PM IST

मुंबई- मुंबईतील निवासी डॉक्टर विविध कोविड रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. अशावेळी त्यांच्या जेवणाची सोय राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका करत आहे. पण सध्या डॉक्टरांना हायप्रोटिन्स युक्त अन्न पदार्थांची गरज आहे. हीच गरज लक्षात घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी निवासी डॉक्टरांना हायप्रोटिन्स युक्त खाद्यपदार्थाच्या 3500 पाकिटाचे वाटप केले.यावेळी मनसे नेते अमित ठाकरे उपस्थित होते.

कोरोना लढ्यातील निवासी डॉक्टरांना मनसेकडून हायप्रोटिन्सयुक्त खाद्यपदार्थांचे वाटप

निवासी डॉक्टरांना हायप्रोटिन्स युक्त अन्न पदार्थांची 3500 पाकिटे अमित ठाकरेंनी मनसेमार्फत दिली आहेत. यात शेंगदाणा चिक्क्की, राजगिरा चिक्कीसह अन्य पदार्थांचा समावेश आहे. सद्या मेस बंद असल्याने आणि निवासी डॉक्टर 10-10 तास रुग्णसेवा देत असल्याने त्यांच्या खण्यापिण्याचे हाल होत आहेतच. तर पौष्टिक जेवण डॉक्टरांना दिले जात आहे. मात्र प्रोटिन्सची कमतरता भरून निघत नसल्याने चित्र आहे. त्यामुळेच प्रोटिन्स युक्त अन्न पदार्थ मनसेकडून दिले आहेत.

मनसे नेते अमित ठाकरे यांनी याआधी निवासी डॉक्टरांच्या संघटनेला, मार्डला पीपीइ किट, मास्क आणि हॉस्पिटल बेडशीटचे वाटप केले आहे. या साहित्याचे वाटप जे. जे. रुग्णालय, केईएम, नायर, सायन आदी रुग्णालयातील डॉक्टरांना करण्यात आले होते.

Last Updated : May 3, 2020, 3:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.