ETV Bharat / city

MNS On Dasara Melava: अभ्यासपूर्ण बोलायला राज ठाकरेंसारखा वाघ लागतो - दसरा मेळाव्यावर मनसेची टीका - राजू पाटील ट्वीट

उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि एकनाथ शिंदे (eknath shinde) या दोघांच्याही दसरा मेळाव्यावर मनसेकडून टीका करण्यात आली आहे. (MNS On Dasara Melava). मनसेचे आमदार राजू पाटील (raju patil) व प्रवक्ते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Raju patil
Raju Patil
author img

By

Published : Oct 6, 2022, 11:07 AM IST

मुंबई: मुंबईत दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी स्वतंत्र मेळावे घेत आपली ताकद दाखवून दिली. मध्य मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची पारंपरिक सभा झाली. यावेळी त्यांनी अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. तर बीकेसी येथील मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची सभा झाली. या दोन्ही सभांवर आता मनसेकडून टीका करण्यात आली आहे. (MNS On Dasara Melava). मनसेचे आमदार राजू पाटील (raju patil) व प्रवक्ते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मजा नाय राव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलंय की, भाषणासाठी कोणाला कोणावरचा 'राग' लागतो. अभ्यासपूर्ण बोलायला राजसाहेबांसारखा 'वाघ' लागतो. राजसाहेब ते राजसाहेबच. मजा नाय राव." असं म्हणत आमदार पाटील यांनी उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यावर टीका केली आहे.

नुसतीच उणिधुनी : मनसेचे सरचिटणीस व प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की, "नुसतीच उणी-धुणी, नळ आणि भांडण, विचार ही नाही आणि सोनं ही नाही, अशी टीका देशपांडे यांनी केली आहे.

दरम्यान, शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा खरपूस समाचार घेत शिंदे सारख्या कटप्पाला शिवसैनिक कधीच माफ करणार नसल्याचे म्हटले. ते म्हणाले की, भाजपसोबत अडीच वर्षांचा मुख्यमंत्री ठरला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन मी हे सांगतो. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या या टिकेला एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या भाषणातून जशाच तसे उत्तर दिलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.