मुंबई - आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या ( BMC Election 2022 ) पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक ( MNS leaders meeting in mumbai ) बोलावली आहे. या बैठकीत मनसेच्या विविध समित्यांचे अध्यक्ष निवडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे BMC निवडणुकीची जबाबदारी राज ठाकरे कुणाच्या खांद्यावर देणार हे आज स्पष्ट होणार आहे.
राज ठाकरेंनी दिले होते तयारीला लागण्याचे आदेश -
या पूर्वी 2 फेब्रुवारीला वरळीतील MIG क्रिकेट क्लबमध्ये झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागण्याचे आदेश दिले होते. व कोणतीही वेगळी चर्चा न करता प्रभाग बांधणीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते.
युतीवर चर्चा नको -
इतर पक्ष निवडणुकीच्या तयारीला मनसे भाजप सोबत युती करणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावर राज ठाकरे यांनी "युती होईल कि नाही ते पुढे बघू पण तुमची स्वतंत्र लढण्याची तयारी असली पाहिजे. तुम्ही युतीच्या चर्चेत पढू नका. निवडणुकीच्या अनुसंघाने कामाला लागा. विधानसभावार कमिटी नेमली जाणार मग ही कमिटी अहवाल तयार करणार आहे." असे म्हटले होते.
महापालिकेची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर देणार -
दरम्यान, 2 तारखेला स्थापन केलेल्या या समित्यांवर आज अध्यक्ष नेमण्यात येणार असून राज ठाकरे ही जबाबदारी नेमकी कुणाच्या खांद्यावर देणार हे आज स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा - Khaire Vs Danve Aurangabad : माझी अन् दानवेंची बरोबरी होत नाही; मी राज्यातील 13 प्रमुख नेत्यांपैकी एक -खैरे