ETV Bharat / city

MNS Leader Raj Thackeray : राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना शपथ; म्हणाले, 'महाराष्ट्रात सुराज्य निर्माणासाठी प्रयत्नांची...' - दादर शिवाजी पार्क मनसे शिवजयंती

मनसेच्या वतीने दादर मधील शिवाजी पार्क येथे तिथीनुसार शिवजयंती ( Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 ) साजरी करण्यात आली. यावेळी राज ठाकरे (MNS Leader Raj Thackeray ) यांनी महाराष्ट्रात सुराज्याच्या निर्मितीसाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू, अशी शपथ कार्यकर्त्यांना दिली आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray
author img

By

Published : Mar 21, 2022, 3:44 PM IST

मुंबई - आज तिथीनुसार शिवजयंती ( Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 ) निमित्त मनसेकडून दादरच्या शिवाजी पार्क ( Dadar Shivaji Park ) मध्ये मोठ्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मनसेचे कार्यकर्ते दादर मध्ये दाखल झालेले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Leader Raj Thackeray ) यांनी कार्यकर्त्यांना एक शपथ देखील दिली आहे.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "आज महाराजांच्या जयंती निमित्त मी शपथ घेतो की स्वराज्याच्या उभारणीनंतर महाराजांनी जी स्वराज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न केला. त्याला अनुसरून महाराष्ट्रात सुराज्याच्या निर्मितीसाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू. जाती-जातीत विभागला गेलेला समाज एक रहावा यासाठी प्रयत्न करू. महिलांचा आत्मसन्मान व नागरिकांच्या सुदृढ आरोग्य यासाठी सदैव काम करू," अशी शपथ राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.

लहान मुलांसोबत संवाद

दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांनी लहान मुलांसोबत देखील संवाद साधला. यातील एक चिमुकला छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा करून आला होता. राज ठाकरे यांनी त्याची विचारपूस केली व त्याच्याशी संवाद साधला. काही तरुण रायगडावरून शिवज्योत घेऊन आले होते, त्यांच्याशीही राज ठाकरे यांनी चर्चा केली आहे.

हेही वाचा - Malik has no bail: 4 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी, नवाब मलिकांचा जेलमधील मुक्काम वाढला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.