ETV Bharat / city

अमित ठाकरेंनी लुटला फुटबॉलचा आनंद, सामन्यात सहभागी होत संघाला केले विजयी - समर्थ व्यायाम मंदिर

मनसे पक्षाचे माहीम विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी फुटबॉल सामन्यांचे आयोजन केले होते. या सामन्याच्या उद्घाटनाला अमित ठाकरे यांना बोलवण्यात आले होते. त्यांनी सामन्याचे उद्घाटन तर केलेच शिवाय, या त्यांनी सामन्यात स्वतः सहभागी होऊन खेळाचा मनमुराद आनंद लुटला.

अमित ठाकरेंनी लुटला फुटबॉलचा आनंद,
अमित ठाकरेंनी लुटला फुटबॉलचा आनंद,
author img

By

Published : Aug 23, 2021, 7:13 AM IST

Updated : Aug 23, 2021, 8:39 AM IST

मुंबई - मनसे नेते अमित ठाकरे यांचे फुटबॉल प्रेम हे सर्वानाच माहीत आहे. अनेक वेळा त्यांना फुटबॉल खेळताना पाहिले गेले होते. शनिवारी देखील दादर शिवाजी पार्क येथे अमित ठाकरे यांनी फुटबॉलचा आनंद लुटल्याचे दृश्य पाहायला मिळाले. पक्षाचे माहीम विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी फुटबॉल सामन्यांचे आयोजन केले होते. या सामन्याच्या उद्घाटनाला अमित ठाकरे यांना बोलवण्यात आले होते. त्यांनी सामन्याचे उद्घाटन तर केलेच शिवाय, या त्यांनी सामन्यात स्वतः सहभागी होऊन खेळाचा मनमुराद आनंद लुटला.

अमित ठाकरेंनी लुटला फुटबॉलचा आनंद,
अमित ठाकरेंनी लुटला फुटबॉलचा आनंद,
या सामान्यावेळी मनसे नेते अमित ठाकरे यांनी श्री समर्थ व्यायाम मंदिर संघाचे प्रतिनिधित्व केले. या सामन्यात अमित ठाकरे यांनी दोन उत्कृष्ट गोल करत संघाला आघाडी दिली. यावेळी त्यांनी काही अप्रतिम पासही केल्याचे क्षण पाहायला मिळाले. अमित ठाकरेंच्या संघाने केलेल्या सांघिक कामगिरी करत या सामन्यात वांद्रे फुटबॉल संघावर विजय मिळवला. अमित ठाकरे यांना फुटबॉल खेळाची खास आवड असल्याचे अनेक वेळा दिसून आलेले आहे. तसेच यापूर्वी ते वडील राज ठाकरे यांच्यासोबत टेनिस देखील खेळताना दिसून आले आहेत.
अमित ठाकरेंनी लुटला फुटबॉलचा आनंद

विशेष म्हणजे यावेळी पाऊस पडला असल्याने मैदानावर पाणी साचले होते. पावसाच्या साचलेल्या पाण्यात आणि चिखलाने माखलेल्या मैदानात अमित ठाकरे यांनी फुटबॉल खेळण्याच्या मोहाला आवर न घालता या सामन्यात सहभाग नोंदवला आणि खेळाचा आनंद लुटला.

Last Updated : Aug 23, 2021, 8:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.