मुंबई - दिवाळीनिमित्त दादरच्या शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून लावण्यात आलेले आकाश कंदील पालिकेने उतरवल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. यातच शिवसेनेचे कंदील, झेंडे व पोस्टर्स न काढल्याने मनसैनिकांध्ये संताप आहे.
याप्रकरणी मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी पालिकेचे वॉर्ड ऑफिसर किरण दिघावकर यांना चांगलेच धारेवर धरले.
मनसेच्या शुभेच्छांवर कारवाई; परंतु, शिवसेनेचे लावलेले कंदील का काढले नाही, असा प्रश्न देशपांडे यांनी उपस्थित केला. पक्षीय राजकारण न करता पालिका अधिकाऱ्यांनी त्यांचं काम करावं, असे ते म्हणाले.