ETV Bharat / city

Raj Thackeray PC :...तोपर्यंत हनुमान चालीसा चालूच राहणार; 135 मशिदींवर कारवाई का नाही? राज ठाकरेंचा सवाल

आम्हाला दंगली घडवायच्या नसून आम्ही पोलिसांना समजावून सांगत आहोत. त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे, असे राज ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत म्हटले.

राज ठाकरे
राज ठाकरे
author img

By

Published : May 4, 2022, 1:14 PM IST

Updated : May 4, 2022, 1:39 PM IST

मुंबई - हनुमान चालीसाचे आंदोलन हे एका दिवसाचे नाही. जोपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवले जात नाही, तोपर्यंत मनसे मशिदींसमोर हनुमान चालिसा वाजवत राहतील, असा पवित्रा राज ठाकरे यांनी घेतला आहे. आज सकाळपासून मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न केला. याबद्दल राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात 90 ते 92 टक्के ठिकाणी सकाळची अजान झालेली नाही. त्या मशिदीतील मुल्ला-मौलवींचे मी आभार मानतो. तर इतर 135 मशिदींमध्ये लाऊडस्पीकरवर अजान झाली. त्या मशिदींवर कारवाई केव्हा करणार, असा सवाल त्यांनी केला.

  • It's not only about mosques, there are several temples where illegal loudspeakers are running. I have already made it clear that it's (illegal loudspeakers) not a religious issue but a social issue: MNS chief Raj Thackeray pic.twitter.com/mALQFfy0WF

    — ANI (@ANI) May 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुल्ला-मौलवींचे मानले आभार - महाराष्ट्रातील 90 ते 92 टक्के ठिकाणी सकाळची अजान झाली नाही. माझा विषय त्यांना समजला यासाठी मी मौलवींचे आभार मानतो, असे राज ठाकरे म्हणाले. लोकांना दिवसभराचा त्रास होतो. तो या प्रयत्नातून बंद होईल, असा विश्वास राज यांनी व्यक्त केला. मात्र 135 मशिदींवर सकाळची अजान ही लाऊडस्पीकर लावून झाली आहे. या मशिदींवर कोणती कारवाई पोलीस करणार आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेल्या नियमानुसार कारवाई होत आहे की नाही हे आम्ही पाहात आहोत, असेही राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा - Raj Thackeray : राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा जुना व्हिडीओ ट्विट, उद्धव ठाकरेंना करून दिली आठवण

तोपर्यंत हनुमान चालीसा सुरूच राहणार - जेव्हा निवेदनाची भाषा समजत नाही, तेव्हा आंदोलनाची भाषा सुरु होते. त्यामुळे जोपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवले जात नाही तोपर्यंत हनुमान चालिसाचे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबईतील अनेक मशिदी या अनधिकृत आहेत. त्यांना परवानगी कशी दिली जाते, हा विषय आकलनापलीकडचा आहे. त्यामुळे हा प्रश्न फक्त सकाळच्या अजान पर्यंत मर्यादित नाही. शिवाय आम्हाला एका कार्यक्रमासाठी एक परवानगी दिली जाते. त्यांना 365 दिवसांची परवानगी कशी दिली जाते, असाही सवाल राज यांनी पोलिसांबद्दल उपस्थित केला. आम्हाला दंगली घडवायच्या नसून आम्ही पोलिसांना समजावून सांगत आहोत. त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे.

Last Updated : May 4, 2022, 1:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.