मुंबई - राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी गुजराती आणि राजस्थानी नागरिकांना काढल्यास मुंबई आर्थिक राजधानी राहील का असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला. यावर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. राज ठाकरे यांनी राज्यपालावर हल्लाबोल केला आहे. मराठी माणसाला डिवचू नका अशी टीका राज ठाकरे यांनी राज्यपालांवर केली आहे.
-
"मराठी माणसाला डिवचू नका!" pic.twitter.com/0to6ByNyPk
— Raj Thackeray (@RajThackeray) July 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">"मराठी माणसाला डिवचू नका!" pic.twitter.com/0to6ByNyPk
— Raj Thackeray (@RajThackeray) July 30, 2022"मराठी माणसाला डिवचू नका!" pic.twitter.com/0to6ByNyPk
— Raj Thackeray (@RajThackeray) July 30, 2022
काय आहे प्रकरण - राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी मुंबईतील कार्यक्रमात बोलताना गुजराती आणि राजस्थानी नागरिकांचे कौतुक केले. मात्र यावेळी त्यांनी मुंबईवर वादग्रस्त वक्तव्य केले. मुंबईतून राजस्थानी आणि गुजराती माणसांना काढून टाका, ही मुंबई आर्थिक राजधानी राहणारच नाही. तुमच्याकडे पैसा राहणारच नाही, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी केले. मुंबई ठाण्यातील व्यवसाय हे गुजराती आणि राजस्थानी माणसांच्या हातात आहेत. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील आर्थिक नाड्य़ा या माणसांच्या हातात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुजराती आणि मारवाडी माणसांचे मुंबईच्या विकासात योगदान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.