ETV Bharat / city

मनसेकडून मध्य रेल्वेला अल्टिमेटम, समस्या न सोडवल्यास 'खळ्ळ खट्याक' चा इशारा

अमित ठाकरे यांनी मनसेच्या शिष्टमंडळासह मध्य रेल्वेच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मनसेकडून मध्य रेल्वेच्या विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. रेल्वेकडून प्रवाशांच्या समस्यांची सोडवणूक न केल्यास मनसेकडून 'खळ्ळ खट्याक' चा इशारा यावेळी देण्यात आला.

author img

By

Published : Jul 9, 2019, 5:38 PM IST

अमित ठाकरे यांनी मनसेच्या शिष्टमंडळासह मध्य रेल्वेच्या मुख्यालयाला भेट

मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित राज ठाकरे यांनी आज त्यांच्या शिष्टमंडळासह मध्य रेल्वेच्या मुख्यालयात भेट दिली. यावेळी रेल्वेच्या विविध समस्यांबाबत मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक आर. बद्री नारायण यांना मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

अमित ठाकरे यांची मनसेच्या शिष्टमंडळासह मध्य रेल्वेच्या मुख्यालयाला भेट

मनसेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात 'रेल्वे स्थानक व प्रवाशांच्या विविध समस्यांचा' पाढा रेल्वे अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आला. रेल्वेचे इन्फ्रास्ट्रक्चर वाढविण्यात यावे, ज्या ठिकाणी रुळावर पाणी साचते त्या ठिकाणी एलिव्हिटेड मार्ग बांधावा, मध्य रेल्वे स्थानकातील शौचालयाची देखभाल महिला बचतगट यांना देण्यात यावी, तसेच महिलांच्या शौचालयाप्रमाणे पुरुष शौचालयही स्वच्छ ठेवावे आदी विविध प्रश्न यावेळी मांडण्यात आले.

यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे मनसेचे शिष्टमंडळ समाधानी झाले नाही. त्यांनी या समस्या सोडवण्यासाठी रेल्वे प्रशासनाला 3 महिन्यांचा कालावधी दिला आहे. "रेल्वेच्या वेळापत्रक वेळेत धावायला पाहिजे, ही आमची माफक अपेक्षा आहे. रेल्वे प्रशासनाने येत्या 3 महिन्यांत प्रवाशांच्या समस्या न सोडवल्यास मनसेला आपल्या भाषेत अधिकाऱ्यांना जाब विचारावा लागेल. गरज पडल्यास मनसेकडून 'खळ्ळ खट्याक' भाषेत उत्तर दिले जाईल." अशी प्रतिक्रिया मनसे प्रवक्ता संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

Intro:मुंबई - अमित राज ठाकरे यांनी मनसेच्या शिष्टमंडळासह आज मध्य रेल्वेच्या मुख्यालयात भेट दिली. यावेळी त्यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मध्य रेल्वे मार्गावरील स्थानक व प्रवाशांच्या समस्यांचा पाढा रेल्वे अधिकार्यांसमोर मांडल्या. तसेच प्रवाशांच्या समस्यांबाबत अमित राज ठाकरे यांनी मध्य रेल्वेच्या अतिरिक्त महाव्यवस्थापक आर. बद्री नारायण यांना निवेदन दिले.
यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तराला मनसे शिष्टमंडळ समाधानी झाले नाही. त्यांनी या समस्या सोडवण्यासाठी रेल्वे प्रशासनाला 3 महिन्यांचा कालावधी दिला आहे.

Body:
रेल्वे प्रशासनाने येत्या 3 महिन्यांत प्रवाशांच्या समस्या न सोडवल्यास मनसे रेल्वेच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या खलखट्याक भाषेत उत्तर देईल असे मनसे प्रवक्ता संदीप देशपांडे यांनी म्हटले.
रेल्वेच्या वेळापत्रक वेळेत धावल पाहिजे या माफक अपेक्षा आहेत, त्या पूर्ण न केल्यास मनसेच्या भाषेत अधिकाऱ्यांना जाब विचारावा लागेल असा इशारा मनसेच्या वतीने संदीप देशपांडे यांनी दिला.

Conclusion:मध्य रेल्वेवरील गाड्या 15 डब्यांच्या करण्यात याव्यात.
रेल्वेच इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यात यावं, ज्या ठिकाणी रुळावर पाणी साचते त्या ठिकाणी एलिव्हिटेड मार्ग बांधावा, मध्य रेल्वे स्थानकातील शौचालयाची देखभाल महिला बचतगट यांना देण्यात यावी आदी विविध प्रश्न यावेळी मांडण्यात आले.
तसेच महिलांच्या शौचालयाप्रमाणे पुरुष शौचालयही स्वच्छ ठेवावे अशी सूचना देखील अमित ठाकरेंनी दिली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.