मुंबई - राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अखेर राज्य सरकारने नवे निर्बंध जारी केले आहेत. लॉकडाऊन नाही पण कठोर निर्बंध लावले गेले आहेत. मात्र या निर्बंधावर मनसेने शंका उपस्थित केली आहे. कोरोनाचं महाराष्ट्रावर प्रेम आहे, की महाराष्ट्र सरकारचं कोरोनावर प्रेम आहे? की स्वतःच अपयश झाकण्यासाठी टाळेबंदी आणि कोरोनाचा वापर होतोय, असा प्रश्न मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.
महाराष्ट्राला लागून असलेली राज्ये गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश येथे कोरोना वाढत नाही. कोरोनाचं महाराष्ट्रावर प्रेम आहे की, महाराष्ट्र सरकारचं कोरोनावर प्रेम आहे? की स्वतःच अपयश झाकण्यासाठी टाळेबंदी आणि कोरोनाचा वापर होतोय? असे ट्विट देशपांडे यांनी केले आहे.
हे ही वाचा - जळगाव महापालिका सत्तासंघर्ष : भाजपच्या बंडखोर नगरसेवकांना रुचली नाही राष्ट्रवादीच्या खडसेंची 'एन्ट्री'!
नवे निर्बंध -
राज्य सरकारकडून सोमवारी नवे निर्बंध लावण्यात आले आहेत. यामध्ये सिनेमा हॉल, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, लग्न, धार्मिक कार्यक्रम अशा ठिकाणी किती लोकांना परवानगी असेल आणि कोणत्या नियमांचं पालन करावं लागेल यासंदर्भात नियमावली जारी करण्यात आली आहे. सोमवारच्या आकडेवारीनुसार राज्यात १५ हजार ०५१ नवे करोनाबाधित सापडले होते.
हे ही वाचा - राज्यातील कोरोनाची स्थिती गंभीर; केंद्र सरकारचे राज्याला पत्र
या अगोदरही देशपांडे यांनी केला होता आरोप -
सावधान सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे. त्याच नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असं आहे. जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो. टीप- यानंतर अनेक महाविकास आघाडी समर्थक मला ट्रोल करतील पण जे सत्य आहे, ते बोलणारच, असे ट्विट देशपांडे यांनी केले होते.