ETV Bharat / city

Winter Assembly Session :अधिवेशनात लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना केराची टोपली, आमदार किरण सरनाईक आरोप - अपक्ष शिक्षक आमदार किरण सरनाईक

​​लोकप्रतिनिधींच्या सामाजिक प्रश्नांना अधिवेशनात ( Winter Assembly Session ) राज्य शासनाकडून ( Government of Maharashtra ) केराची टोपली दाखवली जाते. अशी खंत अपक्ष शिक्षक आमदारांनी व्यक्त केली. त्याचबरोबर त्यांनी प्रशासनाच्या चुकीच्या कार्यपद्धतीचा पाढा वाचून दाखवला.

MLA Kiran Saranaik
आमदार किरण सरनाईक
author img

By

Published : Dec 29, 2021, 10:41 AM IST

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मंगळवारी समाप्त झाले. या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाबद्दल ( Legislative Assembly Mumbai ) विधान परिषदेचे सदस्य आणि अपक्ष शिक्षक आमदार किरण सरनाईक ( Independent teacher MLA Kiran Saranaik )यांनी खंत व्यक्त केली आहे. ते म्हणाले, अधिवेशनात ​​वर्षोनुवर्षे मांडण्यात येणाऱ्या सामाजिक प्रश्नांना राज्य शासनाकडून केराची टोपली दाखवली जाते. राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे होणार्‍या शासकीय भरती प्रक्रियेविषयी सरनाईक यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या कार्यप्रणालीद्वारे होणारी शिक्षक भरती प्रक्रिया बंद करावी. एमपीएससीच्या धर्तीवर नवी कार्यप्रणाली विकसीत करावी, अशी लक्षवेधी मागणी परिषदेत मांडली. तसेच यावेळी वर्षांनुवर्षे शासनाकडून उत्तरे मिळत नाहीत, अशी खंत व्यक्त केली.

कोकणात सिंचन प्रकल्प चालू होण्याविषयी शिवसेनेचे रामदास कदम ( ShivSena leader Ramdas Kadam ) यांनी विधीमंडळात प्रश्न केले होते. ३० वर्षाचा कालावधी उलटून गेला, तरी उत्तरे मिळाली नसल्याची बाब देखील सरनाईक यांनी सभागृहाच्या समोर मांडली. उपसभापती नीलम गोऱ्हे ( Deputy Speaker Neelam Gorhe ) यांनी मध्येच थांबवत राज्यमंत्र्यांना विषय समजून सांगा, अशी सूचना केली. सरनाईक यामुळे संतप्त झाले. त्यांनी प्रशासनाच्या चुकीच्या कार्यपद्धतीचा यावेळी पाढा वाचला. त्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू ( Minister of State Bachchu Kadu ) म्हणाले की, पवित्र पोर्टल पारदर्शक कारभारासाठी वापरले जाते. कोणत्याही विभागाची रिक्त पदे पवित्र पोर्टलद्वारे भरली जात नाहीत, असे स्पष्ट केले. मात्र, या उत्तराने सरनाईक यांचे समाधान न झाल्याने त्यांनी सभागृहाच्या कामकाजाविषयी असंतोष व्यक्त करत सभात्याग केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.