ETV Bharat / city

MLA Sachin Ahir :...हे म्हणजे शिंदे गटातील आमदारांना उशिरा सुचलेलं शहाणपण; सचिन अहिरांची टीका - शिंदे गटावर सचिन अहिरांची टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) आणि उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी एकत्र यावे, असे आमदार उदय सामंत आणि शहाजीबापू पाटील यांनी मत व्यक्त केले होते. मात्र उदय सामंत ( Uday Samant ) हे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमच्यासोबत होते. त्यावेळी त्यांनी हा प्रयत्न केला असता तर, आज ही वेळ आलीच नसती. त्यांना उशिरा सुचलेले हे शहाणपण आहे, असा टोला आमदार सचिन अहिर ( MLA Sachin Ahir ) यांनी एकनाथ शिंदे गटातील आमदारांना यांना लगावला आहे.

MLA Sachin Ahir
MLA Sachin Ahir
author img

By

Published : Aug 7, 2022, 3:04 PM IST

Updated : Aug 7, 2022, 3:24 PM IST

मुंबई - मैत्री दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) आणि उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी एकत्र यावे, असे आमदार उदय सामंत आणि शहाजीबापू पाटील यांनी मत व्यक्त केले होते. मात्र उदय सामंत ( Uday Samant ) हे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमच्यासोबत होते. त्यावेळी त्यांनी हा प्रयत्न केला असता तर, आज ही वेळ आलीच नसती. त्यांना उशिरा सुचलेले हे शहाणपण आहे, असा टोला सचिन अहिर ( MLA Sachin Ahir ) यांनी एकनाथ शिंदे गटातील आमदारांना यांना लगावला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व त्यांना मान्य असेल तर, शिवसेनेचे दारे त्यांच्यासाठी नेहमीच उघडी असल्याचे सचिन अहिर म्हणाले आहेत.

प्रतिक्रिया देताना आमदार सचिन अहिर

'अजून नितेश राणे बोलायचे बाकी' : आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे. दीपक केसरकर यांनी एक तारखेला आमच्याकडे कामावर ड्रायव्हर म्हणून रुजू व्हावे असा खरमरीत चिमटा भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांना ट्विटच्या माध्यमातून काढला आहे. यावर बोलताना शिवसेनेचे आमदार सचिन अहिर म्हणाले की, आता केवळ निलेश राणे यांनी ट्विट करून दीपक केसरकर यांच्यावर बोलले आहेत. अजून नितेश राणे बोलायचे बाकी आहेत. नितेश राणे यांनी केलेल्या ट्विट्स आम्ही स्वागत करतो, असा चिमटा सचिन अहिर यांनी दीपक केसरकर यांना काढला. तसेच दीपक केसरकर यांचा आदित्य ठाकरे यांनीही दिपक केसरकर यांचा योग्य शब्दात समाचार घेतला आहे. कोणी, कोठे, किती बोलावे? त्याची मर्यादा असते. त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे यांनी दीपक केसरकर यांना योग्य शब्दात सांगितला असल्याचे सचिन अहिर म्हणाले आहेत.

'मंत्रालयाला सचिवालय नाव देण्याची वेळ' : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने सचिवांकडे मंत्र्यांची आणि राज्य मंत्र्यांचे अधिकार दिले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावर देखील सचिन अहिर यांनी राज्य सरकारला टोला लगावला असून मंत्रालयाला आता सचिवालय नाव देण्याची वेळ आली असल्याचा चिमटा सचिन अहिर यांनी काढला. राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत पूर परिस्थिती अतिवृष्टी महिला सुरक्षा असे प्रश्न समोर आहेत. अनेक निर्णय घेतले जातात मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. प्रशासनावर वचक राहिलेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला सामावून घ्यायचं याबाबतच अद्याप चर्चा सुरू आहे त्यामुळे राज्यातली जनता वाऱ्यावर आहे. त्यामुळे विरोधीपक्ष म्हणून लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार व्हावा, अशी मागणी सचिन अहिर यांनी यावेळी केली.

हेही वाचा - Ajit Pawar : 'वरिष्ठांना खुश करण्यासाठी तशी वक्तव्य केली जातात'; राज्यपालांना अजित पवारांचा टोला

Last Updated : Aug 7, 2022, 3:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.