ETV Bharat / city

आमदारांकडून कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी ट्रॉमा रुग्णालयास रुग्णवाहिका भेट - corona mumbai update

रुग्णांची वाढती संख्या बघता सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका कमी पडत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना विलगीकरण केंद्रात नेण्यासाठी बरेच वेळा वाट पाहत बसावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे.

रुग्णवाहिका भेट
रुग्णवाहिका भेट
author img

By

Published : May 20, 2020, 6:03 PM IST

मुंबई - कोरोनाबाधित रुग्णांना तत्काळ रुग्णालयात आणता यावे, तसेच त्यांना वेळीच उपचार मिळावे, यासाठी जोगेश्‍वरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र वायकर यांनी दत्ताराम गोविंद वायकर स्मृती ट्रस्टची फोर्स कंपनीची रुग्णवाहिका बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर विलगीकरण केंद्रास भेट देण्यात आली. त्याचा स्वीकार करावा, असे पत्र मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांना दिले आहे.

रुग्णवाहिका भेट

मुंबईच्या विविध भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अशा रुग्णांना घरातून रुग्णवाहिकेच्या माध्यमातून विलगीकरण केंद्रात आणण्यात येते. रुग्णांची वाढती संख्या बघता सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका कमी पडत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना विलगीकरण केंद्रात नेण्यासाठी बरेच वेळा वाट पाहत बसावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे.

राज्य शासन तसेच पालिकेतर्फे देण्यात येणार्‍या रुग्ण सेवेत साथ देण्यासाठी ही रुग्णवाहिका भेट देण्यात आली. रुग्णवाहिकेची चावी व कागदपत्रे आमदार वायकर यांनी के पूर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हवाली केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.