ETV Bharat / city

शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; कोणतीही कारवाई न करण्याचे ईडीला आदेश

author img

By

Published : Dec 9, 2020, 10:59 AM IST

Updated : Dec 9, 2020, 12:06 PM IST

SC on Pratap Sarnaik
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, कोणतीही कारवाई न करण्याचे ईडीला आदेश

10:55 December 09

शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा..

मुंबई - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक व त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

ईडी कडून गुरुवारी आमदार प्रताप सरनाईक यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलेलं होत. प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक याची सुद्धा चौकशी केली जाणार होती. मात्र आमदार प्रताप सरनाईक सरनाईक यांच्या कडून सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने आमदार प्रताप सरनाईक सरनाईक व कुटुंबीयांच्या विरोधात कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केलेली आहे. दरम्यान, गुरुवारी आमदार प्रताप सरनाईक यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर व्हावे लागणार आहे.

एम. शशिधरण यांना १० डिसेंबरपर्यंत ईडी कस्टडी..

मनी लॉंड्रिंग प्रकरणात ईडीकडून टॉप्स सिक्युरिटी ग्रुपच्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली होती. यामध्ये कंपनीचे संचालक अमित चंदोले आणि माजी एमडी एम. शशीधरण यांचा समावेश होता. शशीधरण यांची चौकशी सुरू असताना ते अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसल्याच्या कारणावरुन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना १० डिसेंबरपर्यंत ईडी कस्टडी सुनावली आहे.

Last Updated : Dec 9, 2020, 12:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.