ETV Bharat / city

MLA Dilip Lande :बायकोला सोडेन पण ठाकरेंना सोडणार नाही अन् दोन ठाकरेंसोबतच बंडखोरी; आमदार दिलीप लांडे यांच्या राजकीय बेडूक उड्या - चांदीवली मतदारसंघ

राज्यात राजकीय भूकंप करणारे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( ShivSena rebel leader Eknath Shinde ) गटात सामील झालेले चांदीवली येथील आमदार दिलीप लांडे ( MLA Dilip Lande ) यांनी केलेली बंडखोरी नवीन नाही. याआधीही त्यांनी मनसेसोबत बंडखोरी केली होती. गेल्या ५ वर्षात लांडे यांनी दोन वेळा बंडखोरी केली आहे. दोन्ही वेळा लांडे यांनी ठाकरे यांच्याशीच बंडखोरी केली आहे. दरम्यान, त्यांच्या एकवेळ बायकोला सोडेन पण ठाकरेंना सोडणार नाही या वक्तव्याची पुन्हा आठवण काढली जात आहे.

MLA Dilip Lande
MLA Dilip Lande
author img

By

Published : Jun 25, 2022, 7:51 PM IST

Updated : Jun 25, 2022, 9:33 PM IST

मुंबई - आमदार दिलीप लांडे ( MLA Dilip Lande ) हे रिक्षा चालक होते. नंतर ते बेस्टमध्ये ड्रायव्हर म्हणून नोकरीला लागले. गेले २५ वर्षे राजकारणात आहेत. २०१२ मध्ये कुर्ला चांदीवली मतदार संघातून ( Chandivali constituency ) पहिल्यांदा मनसेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. २०१७ मध्ये दुसऱ्यांदा ते याच विभागातून मनसेचे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. २०१७ मध्येच त्यांनी मनसेचे ६ नगरसेवक फोडून शिवसेनेत प्रवेश केला. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिलीप लांडे हे चांदीवली मतदार संघातून अवघ्या ४०९ मतांनी निवडून आले आहेत. दिलीप लांडे यांना ८५ हजार ८७९ मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे नसीम खान यांना ८५ हजार ४७० मते मिळाली होती.

मनसेमधून पहिल्यांदा बंडखोरी - २०१२ आणि २०१७ मध्ये दिलीप लांडे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक म्हणून मुंबई महापालिकेत निवडून आले होते. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेचे ८४ आणि भाजपाचे ८२ नगरसेवक निवडून आले. शिवसेनेचा महापौर झाला. मात्र, त्यानंतर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पालिकेवर भाजपाचा महापौर बसवणार असे वक्तव्य केल्याने शिवसेनेने मनसेचे ७ पैकी ६ नगरसेवक फोडले. त्यांना शिवसेनेत प्रवेश देऊन महापौरपद आपल्याकडेच राहील याची व्यवस्था केली. शिवसेनेने मनसेचे जे ६ नगरसेवक फोडले त्यात दिलीप लांडे यांचेही होते. दिलीप लांडे हे मनसेचे गटनेते होते.

दुसऱ्यांदा शिवसेनेतून बंडखोरी - २०१७ मध्ये मनसेमधून शिवसेनेत प्रवेश केल्यावर दिलीप लांडे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली. त्यांनी काँग्रेसचे स्थानिक आमदार नसीम खान यांचा पराभव केला. गेले अडीच वर्षे त्यांनी आमदार म्हणून काम केले. नुकतेच शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी जे बंड केले त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकांना लांडे उपस्थित होते. त्यानंतर लांडे यांनी गुवाहटी गाठत ते शिंदे गटात सामील झाले आहेत.

एकवेळ बायको सोडेन - दिलीप लांडे यांचा एक किस्सा खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच सांगितला आहे. दिलीप लांडे यांनी एक वेळ बायकोला सोडेल पण राज ठाकरेंना सोडणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर काही दिवसात दिलीप लांडे यांनी मनसेसोबत बंडखोरी केली आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता पुन्हा लांडे यांनी शिवसेना सोडल्याने त्यांनी केलेल्या एक वेळा बायको सोडेन पण तुम्हाला सोडणार नाही, या वक्तव्याची पुन्हा आठवण काढली जात आहे.

दोन ठाकरेंना सोडले - दिलीप लांडे हे मूळचे शिवसैनिक आहेत. ठाकरे घरात दोन गट झाले. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हा ते राज ठाकरे यांच्यासोबत गेले. गेले तीन दिवस ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते, नंतर ते गुवाहाटीला गेले. असं काय घडलं की जे उद्धव ठाकरे यांच्या सोबत दोन-तीन दिवस राहिले, जेवले आणि नंतर गुवाहटीला गेले. लांडे यांनी दोन ठाकरे बंधूंसोबत बंडखोरी केली आहे. आजही जे गेले आहेत ते आपण शिवसैनिक असल्याचे सांगत आहेत. दीपक केसरकर यांनीही तेच सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात काय होतं ते पाहू या. सध्या वेट अँड वॉचची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेचं बंड, शिवसैनिकांची तोडफोड; मुंबईत 'या' तारखेपर्यंत जमावबंदी लागू

Last Updated : Jun 25, 2022, 9:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.