ETV Bharat / city

...नाहीतर जनता तुम्हाला "चिरुटे" सारखी चिरडेल - आशिष शेलार - MLA Ashish Shelar

अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये ड्रग्स पेडलर जयदीप राणा याचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या पत्नीशी असलेल्या संबंधाबाबत केलेल्या आरोपानंतर आता भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे नवाब मलिकांना उत्तर दिले आहे. एक मंत्री आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे रोज दर्शन घडवत आहे. हा ठाकरे सरकारचा किमान-समान कार्यक्रम आहे का..? कडेलोट झाला आहे. बंद करा हे, नाही तर जनता तुम्हाला "चिरुटे" सारखी चिरडेल, असा इशारा शेलार यांनी ट्विटरद्वारे दिला आहे.

आशिष शेलार
आशिष शेलार
author img

By

Published : Nov 1, 2021, 3:15 PM IST

मुंबई - अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये ड्रग्स पेडलर जयदीप राणा याचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या पत्नीशी असलेल्या संबंधाबाबत केलेल्या आरोपानंतर आता भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे नवाब मलिकांना उत्तर दिले आहे. एक मंत्री आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे रोज दर्शन घडवत आहे. हा ठाकरे सरकारचा किमान-समान कार्यक्रम आहे का..? कडेलोट झाला आहे. बंद करा हे, नाही तर जनता तुम्हाला "चिरुटे" सारखी चिरडेल, असा इशारा शेलार यांनी ट्विटरद्वारे दिला आहे.

  • ◆आरोग्य विभागाची परिक्षा जाहीर होताच वारंवार पेपर फुटतो आणि सरकारच्या अब्रूचे धिंडवडे निघतात...
    ◆ सुमारे 31 एसटी कर्मचारी आत्महत्या करतात पैकी एका कर्मचाऱ्यांने तर एसटीलाच लटकून गळफास घेतला आणि ठाकरे सरकारची अब्रू वेशीवर टांगली..
    1/2

    — Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 1, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • ◆ठाकरे सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे का?
    सरकारला जागे करण्यासाठी "उटणे" लावायचे का?
    ◆एक मंत्री आपल्या बौध्दिक दिवाळखोरीचे रोज दर्शन घडवतोय...हा ठाकरे सरकारचा किमान समान कार्यक्रम आहे का?
    कडेलोट झालाय..बंद करा हे,
    नाही तर जनता तुम्हाला "चिरुटे" सारखी चिरडेल!
    2/2

सरकारने मलिकांच्या बाबतीत झोपेचे सोंग घेतले आहे का..?

नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडवणीस यांच्याबरोबर ड्रग्स पेडलर जयदीप राणा याचा फोटो ट्विटरद्वारे शेअर करून ड्रग्स पेडलरबरोबर भाजप नेत्यांचे संबंध असल्याचा आरोप केला आहे. मलिकांनी केलेल्या या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या उत्तर देताना म्हणाले, दिवाळीच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक यांनी फुसका लवंगी बार लावला आहे. दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचे सांगून मलिकांच्या आरोपाला त्यांनी आव्हान दिले आहे. पण, भाजपचे इतरही नेते आता मलिकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर देताना दिसत आहेत. भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांच्या आरोपाबाबत ठाकरे सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे का..? त्यांना झोपेतून जागे करण्यासाठी उटणे लावण्याची गरज आहे का..?, असा खरमरीत टोमणाही आशिष शेलार यांनी दिवाळीच्या तोंडावर लगावला आहे.

सरकारचे धिंडवडे निघत आहेत

आरोग्य विभागाची परीक्षा जाहीर होताच वारंवार पेपर फुटतात सरकारच्या अब्रूचे धिंडवडे निघतात. सुमारे 31 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी एका कर्मचाऱ्याने तर एसटीमध्येच गळफास घेतला आहे, अशा पद्धतीने ठाकरे सरकारची अब्रू वेशीवर टांगली आहे, असा टोलाही शेलार यांनी ट्वीटद्वारे लगावला.

हे ही वाचा - मुंबई रिव्हर अँथम : मलिकांच्या आरोपांनुसार अमृता फडणवीसांचे ड्रग्ज माफियाशी संबंध दर्शवणारे हेच 'ते' गाणे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.