मुंबई : मुंबईतील गोरेगाव पूर्व ( Bag missing in Goregaon east ) येथे एका ऑटोरिक्षात चुकून पासपोर्ट आणि लॅपटॉप विसरून ( Forgetting passport and laptop in auto ) गेलेल्या भारतीय वंशाच्या थाईलंड नागरिकाला चार तासांत त्याचे सामान परत मिळाले ( Thailand citizen found missing bag ). ही कामगिरी दिंडोशी पोलिसांनी ( Dindoshi police found missing bag of Thailand citizen ) अवघ्या चार तासात पार पाडली. थायलंडच्या नागरिकाने दिंडोशी पोलिसांचे आभार मानले ( Thailand citizen thanked Dindoshi police ) आहे.
हरवलेली बॅग चार तासांनंतर हातात- मूळचा भारतीय वंशाचा थायलंडचा रहिवासी दीपक भालदवा (45) हा व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत आला होता. रविवारी 7 ऑगस्टला तो नेदरलँडला जाणार होता. रविवारी सकाळी 11 च्या सुमारास तो त्याच्या नातेवाईकाच्या घरातून निघाला. नातेवाईकाच्या घरातून ओबेरॉय मॉलमध्ये जाण्यासाठी दीपक एक ऑटोरिक्षाने गेला. दीपकला त्याच्या एका मित्राला भेटायचे होते. ऑटोमधून उतरताना तो पासपोर्ट, आणि लॅपटॉप असलेली बॅग विसरला रिक्षातच विसरला. त्याने तातडीने दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. दिंडोशी पोलिसांनी तपास सुरू केला. दिंडोशी पोलिस अधिकाऱ्यांनी सीसीटीव्हीच्या मदतीने ऑटोचा माग काढला आणि ऑटो रिक्षाचालकाला गाठून बॅग ताब्यात घेतली.