ETV Bharat / city

'राजगृह' तोडफोड प्रकरणी सखोल चौकशी आणि दोषींवर कडक कारवाई : वर्षा गायकवाड - मुंबई शहर बातमी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या दादर येथील 'राजगृह' या वास्तूवर अज्ञात समाजकंटकांनी मंगळवारी सायंकाळी भ्याड हल्ला केला. हल्लेखोरांनी राजगृहच्या आवारात तोडफोड केली. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट आली आहे.

minister varsha gaikwad
मंत्री वर्षा गायकवाड
author img

By

Published : Jul 8, 2020, 6:26 PM IST

मुंबई - भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी (7 जुलै) रोजी अज्ञात समाजकंटकांनी हल्ला करत तोडफोड केली. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राजगृहाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी समाजमाध्यमांसोबत संवाद साधत, या प्रकरणी सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले.

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड ?

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. मुंबईच्या दादरमधल्या हिंदू कॉलनी परिसरात त्यांचे हे निवासस्थान आहे. ह्याच पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व त्यांचे पिता तसेच माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी राजगृहाची पाहणी केली. तिथे झालेल्या घटनेचा आढावा वर्षा गायकवाड यांनी घेतला. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचेे शिक्षणमंत्र्यानी सांगितले.

'राजगृह' भेटीनंतर मंत्री वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा - व्हिडिओ : 'राजगृह' म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींचा अमुल्य ठेवा

नेमके प्रकरण काय ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ठिकाणी मंगळवारी सायंकाळी अज्ञातांनी तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. राजगृह या ठिकाणी असलेला सीसीटीव्ही कॅमेरा आणि झाडांच्या कुंड्या यांची तोडफोड करण्यात आली. ही घटना घडताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

'राजगृह'च्या घटनेनंतर राज्यातील नेतेमंडळींकडून घटनेचा निषेध आणि कारवाईची मागणी

1. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही : मुख्यमंत्री

'राजगृहाच्या आवारात शिरून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथ खजिना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

अधिक वाचा - राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

2. प्रकाश आंबेडकरांकडून शांततेचं आवाहन

'मी सगळ्यांना व्हिडीओद्वारे आवाहन करतो आहे की सगळ्या आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी, ही गोष्ट खरी आहे की राजगृहावर दोघेजण आले त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर गोष्टी तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातले. पोलिसांनी त्यांचे कर्तव्य केले. राजगृहाच्या आजूबाजूला आंबेडकरवाद्यांनी जमू नये, पोलीस त्यांचे काम करत आहेत. आपण सगळ्यांनी शांतता राखावी' असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

  • राज्यातील सर्व आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी. 'राजगृह' आपल्या सर्वांसाठी आदराचे ठिकाण आहे. माझे आपल्या सर्वांना आवाहन आहे की, आपण शांतता राखावी. pic.twitter.com/P31MTvJhb4

    — Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

4. आरोपींना अटक करण्याची फडणवीसांची मागणी

'भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी आमची मागणी आहे' असे मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

  • भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या 'राजगृह' यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी आमची मागणी आहे.
    मी स्वतः मा. भीमराव (दादासाहेब) आंबेडकरजी यांच्याशी फोनवर चर्चा केली तसेच...
    (1/2)

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.