मुंबई - राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant ) हे विद्यापीठांच्या अधिकारावर अतिक्रमण करत आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 प्रमाणे परीक्षेचे नियोजन करणे आणि परीक्षा कशा घेण्यात याव्यात याचे अधिकार विद्यापीठाकडे आहे. परंतु, मंत्री उदय सामंत हे वारंवार आपल्या भूमिका बदलत आहेत. याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होत आहे. त्यामुळे उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी विद्यार्थ्यासोबत चर्चा व संगणमत करून सर्व विद्यापीठांना विद्यार्थीही साधण्याचे निर्देश द्यावे. तसेच विद्यापीठाच्या अधिकारावरील अतिक्रमण थांबवावा, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट युनियन (मासू)चे संस्थापक अध्यक्ष ऍड. सिद्धार्थ इंगळे यांनी केली आहे.
सामंत यांच्या ट्विटर मालिकांचा त्रास विद्यार्थ्यांना- सिद्धार्थ इंगळे म्हणाले, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एक ट्विट मालिका सुरू केली होती. या ट्विट मालिकेत सामंत यांनी बरेच ट्विट केले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये फार मोठा संभ्रम निर्माण करण्यात आलेला आहे. उदय सामंत हे कोविड काळापासून ते आजतागायत वारंवार त्यांची भूमिका बदल आले आहे. त्यांच्या फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी एक नोटिफिकेशन काढले होते. या नोटिफिकेशनमध्ये सामंत यांनी सांगितले की यापुढे जे काही लेक्चर ऑनलाइन आणि परीक्षा ( Exam Fever 2022 ) ऑफलाइन किंवा ऑनलाइन, असे हायब्रीड मोडमध्ये घेण्याचे विद्यापीठाने ठरवावेत. परंतु, उदय सामंत यांनी मंगळवारी (दि. 26 एप्रिल) सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या बैठक घेऊन ठरवले की, सर्व परीक्षा ऑफलाइन होतील.
सामंत ब्रँड अँबेसिडर सारखे वागतात - महाराष्ट्र राज्य सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 प्रमाणे परीक्षेचे नियोजन करणे आणि परीक्षा कशा घेण्यात याव्यात याचे अधिकार विद्यापीठाकडे आहे. मात्र, उदय सामंत हे विद्यापीठांच्या अधिकारावर अतिक्रमण करत आहेत. राज्यातील विद्यापीठांना स्वतंत्र आहे त्यांचे परीक्षा कशा प्रकारे घेता येतील. खरंतर उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी विद्यार्थ्यासोबत चर्चा व संगणमत करून सर्व विद्यापीठांना विद्यार्थीही साधण्याचे निर्देश द्यावेत, मात्र, मंत्री उदय सामंत असे न करता एका संघटनेचे ब्रँड अँबेसिडर म्हणून वागत असल्याची घणाघाती टीका ऍड. सिद्धार्थ इंगळे यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात - जूनमध्ये परीक्षा घेतल्या तर सप्टेंबरमध्ये निकाल लागतील. यापूर्वी विद्यापीठांचे परीक्षेचे निकाल प्रलंबित आहे. सप्टेंबर महिन्यात निकाल लागतील तर, विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक वर्षे वाया जाऊ शकतात. उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी विद्यार्थ्यासोबत चर्चा व संगणमत करून सर्व विद्यापीठांना विद्यार्थीही साधण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी ऍड. इंगळे यांनी केली आहे.
हेही वाचा - Exam Fever 2022 : ऑफलाइन परीक्षेचा चेंडू कुलगुरू दरबारात; उदय सामंत म्हणाले...