ETV Bharat / city

नवीन शैक्षणिक धोरणातून विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता, मानवी आणि घटनात्मक मूल्ये रुजतील- मंत्री उदय सामंत - उदय सामंत प्रतिक्रिया

नवीन शिक्षण धोरणात बहुसाखीय व समग्र शिक्षण, नैतिकता, मानवी आणि घटनात्मक मूल्य रुजवणे, तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण, उत्कृष्ट दर्जाचे संशोधनासाठी वातावरण निर्मित करणे अशी अनेक तत्त्वे आहेत. याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार आणि खासगी क्षेत्रातील शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज व्यक्त केले आहे.

uday samant
मंत्री उदय सामंत
author img

By

Published : Mar 30, 2022, 9:45 PM IST

मुंबई - महाराष्ट्र शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत प्रगत राज्य आहे. राज्यात विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक विचार आणि त्यावर कृती करण्याची क्षमता निर्माण केली जाते. वैशिष्ट्यपूर्ण क्षमता आणि कौशल्य विकसित करण्यासाठी मेहनत घेतली जाते. नवीन शिक्षण धोरणात बहुसाखीय व समग्र शिक्षण, नैतिकता, मानवी आणि घटनात्मक मूल्य रुजवणे, तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण, उत्कृष्ट दर्जाचे संशोधनासाठी वातावरण निर्मित करणे अशी अनेक तत्त्वे आहेत. याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार आणि खासगी क्षेत्रातील शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज व्यक्त केले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 वर परिषद- महाराष्ट्रातील खाजगी विद्यापीठांची संघटना प्रीमीनंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन(पेरा इंडिया) आणि तुमच्या विद्यापीठातर्फे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीतील संधी आणि आव्हाने या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत मुख्य पाहुणे म्हणून उदय सामंत बोलत होते. यावेळी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंमलबजावणी समितीचे सदस्य आणि इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलगुरू पद्मश्री डॉ. जी. डी यादव, पेरा इंडियाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, सोमम्या विद्यापीठाचे अध्यक्ष समीर सोमय्या असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

परिषदांची आवश्यकता- भारत सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जाहीर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करताना बऱ्याच स्तरावर अडचणी जाणवत आहेत. प्रचलित व्यवस्थेला, सद्य परिस्थिती लागू असलेले शिक्षण पद्धतीनुसार काम करण्याची सवय लागली आहे. नवीन गोष्ट आणि बदल सहजासहजी स्वीकृत न करणे हा मानवी स्वभाव आहे. त्यात बदल घडवून नव्या गोष्टीसाठी मानवी तयारी करण्यासाठी व त्यांच्या अंमलबजावणीसाठी अशा परिषदांची आवश्यकता असल्याचे मत उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले आहेत.

नवीन शिक्षण धोरण म्हणजे शिक्षण क्षेत्राचा नेकलेस- नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आने भारताला शिक्षणात जगाचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. धोरणानुसार विद्यापीठ केवळ पदवी देणारी नसावी तर रोजगार आणि उद्योजक निर्माण करणारी असावी असे इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलगुरू पद्मश्री डॉ. जी.डी यादव म्हणाले, पुनर्विचार, पुन्हा गुंतवणूक आणि नव्याने कल्पना करण्याची संधी या धोरणातून मिळणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर म्हणाले. या भारतीय शिक्षण क्षेत्राचा नेकलेस म्हणून या नवीन धोरण आकडे पाहिले जात आहे या धोरणाच्या अंमलबजावणीनंतर महाराष्ट्र हे उच्च शिक्षणात देशाचे नेतृत्व करेल असे पेरा इंडियाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.