ETV Bharat / city

अखेर पैठणचे संतपीठ होणार सुरू; मंत्री उदय सामंत म्हणाले . . . . - संतपीठ सुरू करण्याची मंत्री उदय सामंत यांची माहिती

संत विद्यापीठाच्या इमारतीमध्ये ५० वर्ग खोल्या, ग्रंथालय आणि १०० विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय असलेले वसतिगृह आहे. संतपीठाची इमारत लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्वाधीन करण्यात येईल असेही मंत्री उदय सामंत म्हणाले.

paithan
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
author img

By

Published : Jul 1, 2020, 7:33 PM IST

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत पैठण येथील संतपीठ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली. आषाढी एकादशी निमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पैठण येथील संतपीठ सुरू करण्यासंदर्भात आढावा बैठक सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीला आमदार अंबादास दानवे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय उपस्थित होते.

सध्या या संत विद्यापीठाच्या इमारतीमध्ये ५० वर्ग खोल्या, ग्रंथालय आणि १०० विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय असलेले वसतिगृह आहे. संतपीठाची इमारत लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्वाधीन करण्यात येईल आणि येत्या शैक्षणिक वर्षापासून संत वाङ्ममयाच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील, असेही सामंत यावेळी म्हणाले.

संत वाङ्मयाचा अभ्यासक्रम तयार करून विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तरचे शिक्षण दिले जाईल आणि विद्यार्थ्यांच्या रुचिनुसार त्यामध्ये योग्य बदल करून संत वाङमयाचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम तयार करण्यात येईल. तो तयार करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार आहे. या आठवड्यात पैठण येथील संतपीठाच्या जागेची पाहणी करून याबाबत पुन्हा आढावा घेण्यात येईल, असेही सामंत यांनी संगितले.

यावेळी संचालक डॉ. धनराज माने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले सहभागी झाले होते. पैठण येथे संतपीठ सुरू करण्यासंदर्भात मागील काही वर्षांपूर्वीच निर्णय झाला होता. परंतु त्याची अंमलबजावणी आतापर्यंत होऊ शकली नाही. आज पुन्हा एकदा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षात पैठण येथे हे संतपीठ आणि त्यातील भागवत धर्माच्या अभ्यासक्रमाची सुरुवात होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.