ETV Bharat / city

चैत्यभूमीच्या स्तुपाला काही झाल्यास आंबेडकरी अनुयायी सहन करणार नाही - रामदास आठवले - मुंबई चैत्यभूमी दुरुस्ती बातमी

चैत्यभूमी स्तूप धोकादायक झाला असून तो पडणार आहे. स्तूप पडण्याआधीच त्याची दुरुस्ती केली पाहिजे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले. स्तुपाची दुरुस्ती करताना आता जो स्तूप आहे त्यापेक्षा मोठा स्तूप बांधावा. चैत्यभूमी स्तुपाला काही झाले तर आंबेडकरी जनता सहन करणार नाही, असा इशारा देत दुरुस्तीचे काम करावे, अशी मागणी आठवले यांनी केली

minister ramdas athvale on dr babasaheb ambedkar chaityabhmi smarak repair
चैत्यभूमीच्या स्तुपाला काही झाल्यास आंबेडकरी अनुयायी सहन करणार नाही
author img

By

Published : Oct 7, 2020, 8:03 PM IST

मुंबई - लाखो आंबेडकरी अनुयायांचे श्रद्धास्थान असलेली चैत्यभूमी धोकादायक झाली आहे. चैत्यभूमी पडण्याची वाट न पाहाता त्वरित दुरुस्ती करावी. चैत्यभूमीच्या स्तुपाला काही झाल्यास आंबेडकरी अनुयायी हा प्रकार सहन करणार नाही, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलमधील स्मारक येत्या ३ वर्षात पूर्ण होईल असेही आठवले यांनी सांगितले.

चैत्यभूमीच्या स्तुपाला काही झाल्यास आंबेडकरी अनुयायी सहन करणार नाही

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक दादर चैत्यभूमी येथे आहे. चैत्यभूमीचे बांधकाम समुद्रकिनारी आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे या बांधकामाला धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी स्तुपाचे छत कोसळले आहे. चैत्यभूमीची गेल्या काही वर्षांत डागडुजी झाली नसल्याने धोकादायक बनली आहे. त्यामुळे पालिकेने चैत्यभूमीतील भंतेजिना ती रिक्त करण्यास सांगितली आहे. याबाबात आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकी दरम्यान पालिका एमएमआरडीएचे अधिकारी, वास्तूविशारद शशी प्रभू, शहापूर पालनजी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर आठवले पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, की चैत्यभूमी स्तूप धोकादायक झाला असून तो पडणार आहे. स्तूप पडण्याआधीच त्याची दुरुस्ती केली पाहिजे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले. स्तुपाची दुरुस्ती करताना आता जो स्तूप आहे त्यापेक्षा मोठा स्तूप बांधावा. चैत्यभूमी स्तुपाला काही झाले तर आंबेडकरी जनता सहन करणार नाही, असा इशारा देत दुरुस्तीचे काम करावे, अशी मागणी आठवले यांनी केली

इंदू मिलमधील स्मारक ३ वर्षात तयार -

इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे राहणार आहे. हे स्मारक ३६ महिन्यात म्हणजेच ३ वर्षात उभे राहिल. स्मारक उभारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचे आठवले यांनी सांगितले. स्मारकात बाबासाहेबांचा पुतळा 350 फूट उंच आणि चबुतरा 100 असा एकूण 450 फुटांचा पुतळा उभारावा, अशी मागणी मी केली होती. ती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली आहे. हा पुतळा उभरण्याचे काम प्रसिद्ध कलाकार सुतार यांनी आपल्याला मिळावे असे म्हटले आहे. त्यांना काम देण्याबाबत एक्स्पर्ट कमिटीची मिटिंग मध्ये याबाबत निर्णय घेऊ, असे शहापुराजी पालनजीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सुतार यांना काम दिल्यास ८०० ते १००० लोकांना काम मिळेल असे आठवले म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.