ETV Bharat / city

Nawab Malik Arrested : नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही - मंत्री छगन भुजबळ, मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी - nawab malik arrested update

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) यांची आज ( बुधवारी ) सकाळपासूनच ईडी कार्यालयात चौकशी सुरू होती. अखेर त्यांना आता ईडीने अटक केली (Naeab Malik arrested by ED) आहे. आज पहाटे पाच वाजताच्या दरम्यान ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या कुर्ल्यातील राहत्या घरी पोहोचले. त्यानंतर मलिक यांना ईडी कार्यालयात आणण्यात आले. अखेर चौकशीनंतर ईडीने नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आता ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे.

नवाब मलिक संग्रहित छायाचित्र
नवाब मलिक संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 23, 2022, 9:09 AM IST

Updated : Feb 24, 2022, 1:00 PM IST

मुंबई - नवाब मलिक यांच्यावर सुडाचे राजकारण केले जात आहे. म्हणून त्यांचा राजीनामा घ्यायचा प्रश्न येत नाही, असे राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal talk on nawab malik resignation ) यांनी सांगितले. नवाब मलिक याना ईडीने अटक केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या निवस्थानी झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.

नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीचे सत्र सुरू झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यात उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ हे नेते उपस्थित होते. त्याचबरोबर, काँग्रेस पक्षातर्फे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सुनील केदार हे नेते उपस्थित होते. या नेत्यांच्या बैठकीनंतर शरद पवार, छगन भुजबळ महा विकास आघाडीचे नेते यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली. या बैठकीत कुठल्याही परिस्थितीत नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाऊ नये, असे ठरल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.आजच्या प्रकरणानंतर देशभरातून विविध नेत्यांनी शरद पवार यांना फोन केल्याचे सांगितले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा शरद पवार यांना फोन केला. तर, छगन भुजबळ यांनी सांगितले की, हे प्रकरण जुने असून तीस वर्षांपूर्वी झालेल्या प्रकरणाचा आता नव्याने तपास सुरू करण्यात आला असून, सुडाच्या भावनेने नवाब मलिक यांना हटविण्याचा प्रयत्न केला आहे.

अटक करण्याचे आदेश
अटक करण्याचे आदेश

७ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना ईडीकडून अटक.. न्यायालयाकडून ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी..

राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची ३ मार्चपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी याबाबत आदेश दिला आहे.

'काँग्रेस पक्ष मंत्री नवाब मलिक यांच्या पाठीशी; केंद्राने महाराष्ट्राची बदनामी थांबवावी'

राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (ED Arrested Nawab Malik ) यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) कारवाई ही सुडबुद्धीने केलेली आहे. नवाब मलिक सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवत होते. केंद्र सरकारविरोधात आवाज उठवल्यानेच ईडीच्या माध्यमातून कारवाई केली असून आम्ही नवाब मलिक यांच्या पाठीशी आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole on Nawab Malik Arrest ) यांनी म्हटले आहे.

अटकेनंतर ईडी कार्यालयाबाहेर येताना नवाब मलिक

शरद पवारांनी नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा - किरीट सोमैया

बई बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील आरोपींकडून जमिनीचे व्यवहार केल्याप्रकरणी मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले ( ED Take Custody Nawab Malik ) आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये नवाब मलिक दोषी असून, जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही. तोपर्यंत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी किरीट सोमैया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली आहे. तसेच, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेही मलिकांच्या राजीनाम्याची मागणी ( Sharad Pawar Should Resign Malik ) सोमैयांनी केली आहे.

ईडी कार्यालयाबाहेर सुरक्षेची तयारी करताना पोलीस

'2024 नंतर ते आहे अन् आम्ही, भाजपा नेत्यांचीही प्रकरणं ईडीकडे देणार -राऊत

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. सकाळी ६ वाजता ईडीचे चार अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी पोहोचल्याची माहिती आहे. तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू आहेत. काही दिवसापूर्वीच ईडीने नवाब मालिकांना समन्स बजावला असल्याची माहिती आहे. हे समन्स कोणत्या प्रकरणात बजावण्यात आले होते, याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. नवाब मलिकांच्या चौकशी प्रकरणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"नवाब मलिक हे सत्याच्या बाजूने आहेत, ते नेहमीच सत्य बोलत आले आहेत, ते भाजप विरोधात आवाज उठवत आहेत म्हणूनच मलिकांवर ईडीने कारवाई केली आहे. मात्र, कितीही झालं तरी आम्ही मागे हटणार नाही. ही लढाई अशीच सुरू राहील. परंतु तपास यंत्रणांनी 2024 नंतर येणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहावे." असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.

अटकेनंतर ईडी कार्यालयाबाहेरून घेतलेला आढावा

जे जे रुग्णालयात मलिकांची तपासणी -

कुर्ल्यातील एका जमीन खरेदी-विक्री प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना् ईडीने अटक केली आहे. मलिक यांची ईडीकडून आज तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर दुपारी 2 वाजून 55 वाजता मलिकांना अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांना जे जे रुग्णालयात मेडिकल तपासणीसाठी नेण्यात आले आहे. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ईडी नवाब मलिक यांची कस्टडी देखील मागणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मागील आठवड्यात दक्षिण मुंबईत ईडीने टाकले होते छापे -

राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटला असतानाच, ईडीच्या दिल्ली आणि मुंबईतील पथकांनी मागील आठवड्यात दक्षिण मुंबईत काही ठिकाणी छापे टाकले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्या मालमत्तांशी संबंधित प्रकरणात त्याचा जेलमध्ये असलेला भाऊ इक्बाल कासकर, बहीण हसीना पारकर यांच्या घरांसह अन्य काही ठिकाणी ईडीच्या पथकांनी छापे टाकले होते.

काय आहे नेमकं प्रकरण?

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार आज त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक इक्बाल मिर्ची याच्या वरळीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मालमत्तेचा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनीने विकास केला होता. पटेल यांच्या कंपनीने येथे सीजे हाऊस नावाची 15 मजली इमारत बांधून मिर्ची फॅमिलीला तिसर्‍या मजल्यावर 9 हजार चौरस फूट आणि चौथ्या मजल्यावर 5 हजार चौरस फूट असे एकूण 14 हजार चौरस फुटांचे बांधकाम दिले होते. ईडीने ही मालमत्ता जप्त केली आहे. तर, याप्रकरणात ईडीने प्रफुल्ल पटेल यांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदविला आहे.

ईडीने आतापर्यंत वरळीतील सीजे हाऊस इमारतीतील मालमत्तेसह साहिल बंगल्यातील तीन फ्लॅट, ताडदेवमधील अरुण चेंबर्समध्ये असलेले कार्यालय, क्रॉफर्ड मार्केटमधील तीन व्यावसायिक दुकाने, बंगले आणि लोणावळ्यातील 5 एकर पेक्षा अधिक जमीन अशा ईक्बाल मिर्चीच्या तब्बल 600 कोटींच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे.

गेल्या आठवड्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी गँगस्टर दाऊद इब्राहिम कासकर याचा भाऊ इकबाल कासकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. इकबाल कासकरसह इकबाल मिर्ची आणि अस्लम फ्रुट यांनाही ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून केलेल्या चौकशीत कुर्ला परिसरातील एका जमीन खरेदीच्या व्यवहारात नवाब मलिक यांचं नाव समोर येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. इकबाल कासकरच्या चौकशीच्या आधारावर नवाब मलिक यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी कार्यालयात नेले असल्याची माहिती मिळत आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आले होते आरोप-

1993 च्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात गुन्हेगार असणारे सरदार शहावली खान आणि सलीम पटेल या दोघांकडून नवाब मलिक यांनी कुर्ल्यातील जमीन खरेदी केली होती. कुर्ल्यात मोक्याच्या परिसरामध्ये ही तीन एकर जागा असल्याचे फडणीसांनी सांगितले होते. 2005 मध्ये या ठिकाणी दोन हजार रुपये स्क्वेअर फुटच्यावर भाव असताना केवळ पंचवीस रुपये स्केअर फुट किमतीवर ही जमीन खरेदी कशी केली ? असा प्रश्न पत्रकार परिषदेतून देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. मात्र या जमीन खरेदीत कोणताही गैरव्यवहार झाला नसून देवेंद्र फडणवीस सांगत असलेल्या तीन एकर जागा आपण खरेदी केली नाही. त्या जागेवरील काही भाग कायदेशीर रित्या खरेदी केला असल्याचे स्पष्टीकरण नवाब मलिक यांच्याकडून पत्रकार परिषदेत देण्यात आला होता.

'मुस्लिम नेते असल्यामुळे दाऊदशी संबंध जोडण्याचा प्रयत्न'-

नवाब मलिक हे सातत्याने भारतीय जनता पक्षाचे पितळ उघडे पडत आहेत. सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सत्य बोलत असल्यामुळेच नवाब मलिक त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. नवाब मलिक हे मुस्लिम असल्यामुळे त्यांचे थेट नाव दाऊदशी जोडण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातोय. आपण मुख्यमंत्री असताना देखील अशाच प्रकारे विरोधकांकडून प्रयत्न केला गेला होता. त्याचप्रमाणे नवाब मलिक यांचे नाव देतील सोडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. आम्हाला खात्री होती, ते जाहीरपणे बोलतात. त्यामुळे त्यांना अशा प्रकारे त्रास दिला जाईल, याच कल्पना होती. कशाची केस काढली त्यांनी माहीत नाही. काही झाले तरी दाऊदचे नाव घ्यायच, नोटीस पाठवायची. लोकांना बदनाम करणे, त्रास देणे आणि सत्तेचा गैरवापर करण्याचे काम सुरू आहे. केंद्र सरकारच्या विरोधात उघडपणे भूमिका मांडतात त्यांच्यावर कारवाई होत आहे.

आकसातून कारवाई - जयंत पाटील

कोणतीही नोटीस न देता ही आकसातून कारवाई केली जात असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. नवाब मलिक यांनी काही प्रकरणे बाहेर काढली होती. त्यामुळेच जाणीवपूर्वक ही कारवाई केली जात असल्याची टीका पाटील यांनी केली आहे.

नवाब मलिक यांनी केले होते केंद्रीय तपास यंत्रणांवर गंभीर आरोप

महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर अनेक नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर -

2019 मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेत, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची मोट बांधून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणले. शरद पवार यांच्या पुढाकारामुळे हा चमत्कार महाराष्ट्रात घडला खरा, मात्र आघाडीतील नेत्यांना नेहमीच केंद्रीय तपास यंत्रणांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या नवाब मलिक ईडीच्या रडारवर आले आहेत.

आर्यन खान प्रकरणी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप -

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानच्या मुलाला ड्रग्स पार्टीत अटक केली. या प्रकरणात नवाब मलिक यांनी मोठ्या प्रमाणावर संशोधन करून माहिती गोळा केली. या प्रकरणांमधील तसेच पडद्यामागील सत्य सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचा पहिला धाडसी प्रयोग नवाब मलिक यांनी केला. मलिक यांनी रोज पत्रकार परिषदा घेऊन भाजप आणि नार्कोटिक्स विभाग तसेच समीर वानखेडे यांचे खरे चेहरे लोकांसमोर उघडे पाडले. समीर वानखेडे तर अडचणीत आलेच मात्र त्याचबरोबर भाजपच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.

देवेंद्र फडणवीस ड्रग्जच्या उद्योगांचे मास्टरमाईड -

देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्जच्या उद्योगांचे मास्टरमाईड आहेत, असा धक्कादायक आरोप नवाब मलिक यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रग्ज प्रकरणातील सहभागाचा सीबीआय आणि इतर केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून तपास केला जावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली होती. तसेच फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंची बदली केल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.

देशात हिटलरसारखी परिस्थिती निर्माण करुन सगळे नियम, घटना बदलून स्वतःकडे सर्व अधिकार घ्यायचे आहेत का, अशी शंका निर्माण होऊ लागली, असे नवाब मलिक म्हणाले होते. भाजपला लोकशाही संपवायची आहे. परंतु जनता त्यांना लोकशाही संपवू देणार नाही, असा इशारा मलिक यांनी दिला होता.

कुख्यात गुंडांना देवेंद्र फडणवीस यांचे आश्रय -

नागपूरचा कुख्यात गुन्हेगार मुन्ना यादव याची देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारच्या काळात बांधकाम कामगार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. बांगलादेशींच्या अवैध स्थलांतरात सहभागी असलेल्या हैदर आझमची फडणवीस यांनी मौलाना आझाद वित्त महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती, असेही त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांच्या आश्रयाने महाराष्ट्रात बनावट नोटांचे रॅकेट -

देवेंद्र फडणवीस यांच्या आश्रयाने महाराष्ट्रात बनावट नोटांचे रॅकेट सुरू असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. 'पाच वर्षांपूर्वी 8 नोव्हेंबरला देशात नोटाबंदी झाली, देशात 2000 आणि 500 ​​च्या बनावट नोटा पकडल्या गेल्या, मात्र महाराष्ट्रात वर्षभरात बनावट नोटांची एकही घटना घडली नाही. देवेंद्र यांच्यामुळेच बनावट नोटांचे काम सुरू होते. तसेच 8 ऑक्टोबर 2017 रोजी मुंबईतील बीकेसीत एक छापेमारी झाली. यावेळी 14 कोटी 56 लाख पकडले गेले. हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीसांनी मदत केल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.

Last Updated : Feb 24, 2022, 1:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.