मुंबई - महाविकास आघाडी सरकारमध्ये झालेल्या बदल्या ( Minister Nawab Malik comment on transfers ) या नियमानुसारच झाल्या असून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 80 टक्के बदल्या एकाधिकार पद्धतीने झाल्या आहेत, असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) यांनी केला.
हेही वाचा - Reactions on BMC Budget 2022 : '"मुंगेरी लाल के हसीन सपने", "गुलाबी स्वप्न" दाखवणारा अर्थसंकल्प'
महाविकास आघाडी सरकारमध्ये पोलिसांच्या बदल्यांबाबत वादंग उठला असताना यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिले असून, बदल्यांच्या ( Nawab Malik comment on transfers ) बाबतीत सर्व बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. आमदार आणि मंत्र्यांकडून बदल्यांबाबत ज्या शिफारसी येतात त्याची यादी करून शिफारसी एन वन कमिटीकडे पाठवल्या जातात. ज्या बदल्या नियमात बसतात, त्या बदल्या या शिफारशीनुसार केल्या जातात. तसेच, एन टू पद्धतीने देखील बदल्या केल्या जातात. एन टू मध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या शिफारशीनुसार बदली केली जात असते. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काळात झालेल्या बदल्या या शिफारशीनुसार झाल्या असल्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितल. झालेल्या बदल्यांबाबत विभागाच्या प्रमुखांना देखील माहिती देण्यात आली होती. मात्र, भारतीय जनता पक्षाकडून बदल्यांसंदर्भात केवळ आरोप केले जात असल्याचे प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) म्हणाले.
एकाधिकाराने देवेंद्र फडणवीस यांनी 80 टक्के बदल्या केल्या
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी एकाधिकाराने 80 टक्के बदल्या केल्या. तसेच एन वन अंतर्गत ज्या समित्या गठीत करण्यात आल्या होत्या, त्यांच्यासमोर शिफारसी गेल्या नाहीत. सेठ देवेंद्र फडणवीस यांनी 80 टक्के बदल्या केल्या, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.
हेही वाचा - Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणीतील साक्षीदाराने फिरवली साक्ष; एटीएसवरच केले खळबळजनक आरोप