ETV Bharat / city

'राजीव गांधींंच्या जयंतीपासून राज्यात सामाजिक ऐक्य पंधरवडा' - navab malik update news in mumbai

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा २० ऑगस्ट हा जयंती दिवस दरवर्षी सदभावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे पालन करून सदभावना दिवस साजरा करण्यात येणार आहे.

mumbai
मंत्री नवाब मलिक
author img

By

Published : Aug 18, 2020, 3:37 PM IST

मुंबई - दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा २० ऑगस्ट हा जयंती दिवस दरवर्षी सदभावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने राज्यात २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२० या कालावधित सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्याचे शासनाने ठरवल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

राज्यातील विविध भागातील विविध धर्मांच्या व विविध भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकाविषयी ऐक्याची भावना, सौहार्दभाव वृध्दींंगत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उद्दिष्टे हा पंधरवडा साजरा करण्यामागे असल्याचे मलिक यांनी सांगितले.

सदभावना दिवस व सदभावना पंधरवडा हा कोरोना विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभूमी विचारात घेता केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूूचनांनुसार साजरा करण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्रालयाच्या प्रांगणात सामाजिक अंतराचे पालन करून २० ऑगस्ट रोजी सदभावना दिवस साजरा करण्यात येणार असून उपस्थितांना सदभावना दिवसाची प्रतिज्ञा देण्यात येणार आहे.

महसूल विभागाचे आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयातून ऑनलाईन किंवा लाऊड स्पिकरमार्फत सदभावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम आयोजित करावा, तसेच अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहाता यावा यासाठी वेबसाईटव्दारे सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्यासाठी कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मुख्यालयात सामाजिक ऐक्याचा संदेश प्रसृत करण्यासाठी ऑनलाईन वेबिनार इत्यादीव्दारा संवाद, मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करावेत. या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांना भाषण देण्यासाठी निमंत्रित करावे. बृहन्मुंबईत लोकांच्या विशेषत: युवकांच्या सहभागाने सांस्कृतिक कार्य संचालक यांनी सदभावना विषयावर ऑनलाईन वेबिनार इत्यादीव्दारा संवाद, मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करावा. यंदा सदभावना शर्यतसारखे उपक्रम आयोजित करू नये अशा सूचनाही देण्यात आल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.