ETV Bharat / city

तो दाढीवाला व्यक्ती काशिफ खान, मंत्री नवाब मलिक यांचा खुलासा - navab malik alleged that mafia on cruise is Kashiff Khan

क्रुजवरील दाढीवाला माफिया एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांचा मित्र असल्याचा धक्कादायक आरोप पत्रकार परिषदेतून करण्यात आला होता. तो दाढीवाला व्यक्ती काशिफ खान असल्याचा खुलासा नवाब मलिक यांनी आज केला आहे.

navab malik alleged that mafia on cruise is Kashiff Khan
नवाब मलिक खुलासा काशिफ खान
author img

By

Published : Oct 28, 2021, 3:31 PM IST

Updated : Oct 28, 2021, 3:52 PM IST

मुंबई - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काल (27 ऑक्टोबर रोजी) पत्रकार परिषद घेऊन क्रुजवरील दाढीवाला आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया असल्याचा आरोप केला होता. हा दाढीवाला माफिया एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांचा मित्र असल्याचा धक्कादायक आरोप पत्रकार परिषदेतून करण्यात आला होता. तो 'दाढीवाला' व्यक्ती 'काशिफ खान' असल्याचा खुलासा नवाब मलिक यांनी आज केला आहे.

मंत्री नवाब मलिक यांनी क्रुझवरील पार्टीचा सादर केलेला व्हिडिओ

हेही वाचा - Aryan Khan Drug Case LIVE : जामिनावर सुनावणी सुरू; NCB चे वकील बाजू मांडतायेत

कॉर्डिलिया क्रुजवरी जी पार्टी झाली त्या पार्टीचे आयोजन फॅशन टीव्हीने केले होते. या फॅशन टीव्हीचे मॅनेजिंग डायरेक्टर काशिफ खान आहेत. त्यांनी त्या पार्टीचे आयोजन केले असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच, काशिफ खान हे समीर वानखेडेचे अगदी जवळचे मित्र असल्याचा आरोपही त्यांनी पुन्हा एकदा केला असून, कॉर्डिलिया क्रुजवर केलेली कारवाई काही लोकांना अडकवण्यासाठी केली असल्याचा पुन्हा एकदा पुनरुच्चार नवाब मलिक यांनी केला आहे.

काल पत्रकार परिषदेत काय म्हणाले होते मलिक?

राज्याची परवानगी न घेता कोरोनाचे नियम तोडून क्रुझ पार्टीवर छापा टाकण्यात आला. त्यात एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया होता. तो दाढीवाला असून तिथे नाचत होता. काही लोकांच्या म्हणण्यानुसार तो तिहार जेल आणि राजस्थानमधील जेलमध्ये होता. तो दाढीवाला माफिया कोण? दाढीवाल्याची मित्रता वानखेडेसोबत आहे का? त्याला अटक का करण्यात आली नाही, असा सवाल नवाब मलिक यांनी पत्रकारपरिषदेत केला होता.

दिल्लीतील पथकाने शोध घ्यावा -

कॉर्डिलिया क्रुजवर केलेली पूर्ण कारवाई ही समीर वानखेडे तसेच एनसीबीचा बनाव होता, असा धक्कादायक आरोप त्यांनी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला होता. काही विशेष लोकांचे फोटो एनसीबी अधिकार्‍यांकडे होते. केवळ मोजक्या लोकांवर कारवाई करण्यासाठी या पार्टीचे आयोजन केले होते, असा धक्कादायक आरोपही नवाब मलिक यांनी केला होता. दिल्लीतील केंद्रीय पथक मुंबईत येत आहे. त्यांनी या दाढीवाल्याचा आणि त्याच्या मेहबुबाचा शोध घ्यावा. अन्यथा काही दिवसांत मी सर्व पुरावे देणार असल्याचेही नवाब मलिक म्हणाले होते. तसेच, क्रुझची आणि तेथील नृत्याचे सीसीटीव्ही फुटेज मागवा. त्यात हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया सापडेल. त्यानेच ही पार्टी आयोजित केली होती, असा दावा देखील मलिक यांनी केला होता.

समीर वानखेडेंचा फर्जीवाडा

समीर वानखेड यांचा जन्माचा दाखल समोर आणल्यानंतर नवाब मलिकांवर हिंदू - मुस्लीम विभाजनाची टीका करण्यात येत होती. त्यावर मलिक यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, माझा प्रश्न इतकाच आहे की, समीर दाऊद वानखेडे यांनी बोगसगिरी करून अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र घेतले आणि आयआरएस अधिकारी झाले. खुल्या प्रवर्गातील तरुणाने अनुसूचित जातीचा दाखला प्राप्त करून एका दलित मुलाचे त्याने नुकसान केले आहे. मी समोर आणलेले प्रमाणपत्र खोटे असेल तर, त्यांनी खरे प्रमाणपत्र दाखवावे, असे आवाहन त्यांनी केले होते. तसेच, हा प्रकार कायद्याने गुन्हा आहे. या संदर्भातील कागदपत्रे प्रसारित केल्यानंतर काही अल्पसंख्याक सामाजिक संघटनांनी या कागदपत्राची आपल्याकडे मागणी केली असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले होते.

भाजपचा संबंध काय?

कॉर्डिलिया क्रुजवर केलेली खोटी कारवाई, तसेच समीर वानखेडे यांची खोटी कागदपत्रे समोर आणत असताना भारतीय जनता पक्षाचे नेते का अस्वस्थ होत आहेत? या सर्व प्रकरणाचा भारतीय जनता पक्षाचा संबंध काय? या सर्व प्रकरणातून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना पैसे मिळत होते का? असा सवालही नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता.

हेही वाचा - 'रोज सकाळी आमच्या अब्रुची लक्तरं काढली जातेय'; क्रांती रेडकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Last Updated : Oct 28, 2021, 3:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.