ETV Bharat / city

Water Scarcity : यंदा पाणीटंचाई नाही, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा दावा - यंदा पाणीटंचाई नाही

मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात उष्णतेची लाट पसरली आहे. यामुळे उकाडा असह्य होत असला तरी यंदा पाण्याची टंचाई होणार नाही, असा दावा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Minister Jayant Patil ) यांनी केला आहे.

धरण
धरण
author img

By

Published : Apr 5, 2022, 3:14 PM IST

मुंबई - दरवर्षी राज्यात उन्हाळ्यात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. मात्र, गतवर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने यंदा पाणीटंचाई राज्यात होणार नाही, असा दावा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Minister Jayant Patil ) यांनी केला आहे.

राज्यात ६२ टक्के पाणीसाठा शिल्लक - यंदा राज्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा असून ३ हजार २६४ धरणांमध्ये सरासरी ६२.५७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी हा साठा ५३.२४ टक्के इतका होता. नागपूर विभागातील ३८४ धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा जास्त असून ते ५०.०६ टक्के इतका जलसाठा आहेत. गेल्या वर्षी हा जलसाठा ४६.७२ टक्के इतका होता. तर सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या मराठवाडा विभागातील यांना पाणीसाठा उपलब्ध असून मराठवाड्यातील ९६४ धरणांमध्ये ६५.०६ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.

पस्तीस हजार दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध - राज्यातील सहा महसुली विभागात १४१ मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये ३५ हजार ४५१.०६ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. एकूण क्षमतेच्या ६४.८८ टक्के इतका पाणीसाठा आहे. गतवर्षी आजच्या दिवशी हा पाणीसाठा ५६.४६ टक्के इतका होता. अमरावती विभागातील १० मोठ्या प्रकल्पांमध्ये यंदा ५८.९२ टक्के इतका पाणीसाठा आहे. औरंगाबाद विभागातील ४५ मोठ्या धरणांमध्ये ६८.६३ टक्के, कोकणात ११ धरणांमध्ये ६०.०२ टक्के नागपूर विभागात सोळा धरणांमध्ये ४६.०८ टक्के, नाशिक विभागातील २४ धरणांमध्ये ६०.३६ टक्के, पुणे विभागातील ३५ मोठया धरणांमध्ये सर्वाधिक ७१.०७ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाई जाणवणार नाही, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

हेही वाचा - SIT to probe ED: ईडी अधिकाऱ्यांवर संजय राऊतांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी एसआयटीचे गठन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.