मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या अंतरिम निकालानंतर राज्य सरकार यासाठी विविध पर्याय शोधत आहे. मात्र, या निकालावर अध्यादेश काढण्यात येऊ नये, असे अनेक तज्ज्ञांना वाटते. त्यामुळे तूर्तास तरी मराठा आरक्षणासाठी सरकारकडून अध्यादेशाचा पर्याय आणि त्याचा विचार केला जात नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
मराठा आरक्षणासाठी अध्यादेशाचा पर्याय नाही - जयंत पाटील
मराठा आरक्षणात उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांच्यासोबतच जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी त्यांच्यात मराठा आरक्षण व केंद्रातील शेतकरी विरोधी कायद्यासंदर्भात काय भूमिका घ्यायची याबाबत चर्चा झाल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.
मराठा आरक्षणासाठी अध्यादेशाचा पर्याय नाही
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या अंतरिम निकालानंतर राज्य सरकार यासाठी विविध पर्याय शोधत आहे. मात्र, या निकालावर अध्यादेश काढण्यात येऊ नये, असे अनेक तज्ज्ञांना वाटते. त्यामुळे तूर्तास तरी मराठा आरक्षणासाठी सरकारकडून अध्यादेशाचा पर्याय आणि त्याचा विचार केला जात नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
Last Updated : Sep 21, 2020, 6:15 PM IST