मुंबई - 'काश्मीर फाईल्स' हा सिनेमा ( Kashmir Files ) मध्यांतरानंतर कंटाळवाणा आहे. तुम्ही तो बघायला गेलात यावर म्हणणं नाही, फक्त निर्मात्याकडे 160 कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यातून काश्मीरी पंडितांना घर बांधण्यासाठी दान करायला सांगा, अशी मागणी जयंत पाटील ( Jayant Patil on Kashmir Files ) यांनी आज ( दि. 23 मार्च ) सभागृहात केली. काल सभागृहात भाजपचे सदस्य उपस्थित नव्हते, असेही जयंत पाटील म्हणाले. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी आम्ही 'डंके के चोटे पे' 'काश्मीर फाईल्स' बघायला गेलो होतो. कोणाला काय आक्षेप घ्यायचा त्यांनी सदनाबाहेर जाऊन बोलावे, असे ओरडतच सांगितले.
यावर बोलताना जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच सुनावले. 'काश्मीर फाईल्स'वर जयंत पाटील बोलत असतानाच भाजप आमदार योगेश सागर खाली बसून जोरजोरात बोलत असल्याचे लक्षात येताच जयंत पाटील संतापले. खाली बसून बोलण्याची पद्धत बंद करा आम्हालाही खाली बसून बोलता येते त्यावेळी अडचण झाली तर बोलू नका असे, स्पष्ट शब्दात खडे बोल सुनावले. सभागृहात पहिल्यांदाच शांत असणारे जयंत पाटील संतापलेले पाहायला मिळाले. यावेळी 'काश्मीर फाईल्स'वरून जयंत पाटील विरुद्ध फडणवीस व भाजप सदस्य, अशी खडाजंगी सभागृहात पाहायला मिळाली.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा काश्मिरी पंडितावरचा द्वेष बाहेर आला - काश्मिरी पंडितावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा द्वेष बाहेर आला आहे. हा चित्रपट करमणुकीसाठी नाही तर त्यावेळची सत्य परिस्थिती लोकांसमोर यावी यासाठी बनवला गेला आहे. मात्र, यावरही जयंत पाटील वक्तव्य करत असतील तर हा काश्मिरी पंडीतांबद्दल द्वेष नाही तर काय आहे, असा सवाल भाजप आमदार राम कदम (दि. 23 मार्च) यांनी उपस्थित केला.
हेही वाचा - Phone Tapping Case : रश्मी शुक्ला जवाब नोंदवण्यासाठी दुसऱ्यांदा पोलीस स्टेशनमधे पोचल्या