ETV Bharat / city

बीड जिल्हा परिषदेकडून 'दिव्यांगसाथी' संकेतस्थळाची निर्मिती; धनंजय मुंडेनी केले उद्घाटन

author img

By

Published : May 2, 2020, 5:16 PM IST

दिव्यांग व्यक्तींसाठीच्या विशेष योजनांचा लाभ देणे सुकर होण्यासाठी बीड जिल्हा परिषद आणि समाज कल्याण विभागातर्फे 'दिव्यांगसाथी' या विशेष संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.

dhananjay munde news
धनंजय मुंडे यांनी दिव्यांगसाथी या संकेतस्थळाचे उद्घाटन केले

मुंबई - दिव्यांग व्यक्तींसाठीच्या विशेष योजनांचा लाभ देणे सुकर होण्यासाठी बीड जिल्हा परिषद व समाज कल्याण विभागातर्फे 'दिव्यांगसाथी' या विशेष संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. या संकेतस्थळाचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याने अशा प्रकारचे संकेतस्थळ निर्माण करावे, अशी सुचना यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

दिव्यांग व्यक्तींची ऑनलाईन नोंदणी, प्रमाणपत्र तसेच दिव्यांगांसाठी असलेल्या विशेष योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने बीड जिल्हा परिषद आणि समाज कल्याण विभागाच्या या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.

  • दिव्यांग व्यक्तींची ऑनलाईन नोंदणी, प्रमाणपत्र तसेच दिव्यांगांसाठी असलेल्या विशेष योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने बीड जिल्हा परिषद व समाज कल्याण विभागाच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या 'दिव्यांगसाथी' (https://t.co/9NqiaManVN) या विशेष संकेतस्थळाचे उद्घाटन केले. pic.twitter.com/Obi6iZyAg5

    — Dhananjay Munde (@dhananjay_munde) May 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा... ..तर मुंबईतून केंद्राला जाणारा कर रोखण्यात येईल, खासदार शेवाळेंचा इशारा

या संकेतस्थळावरून जिल्ह्यातील दिव्यांगांची नोंदणी, प्रमाणपत्र प्राप्त लाभार्थ्यांना ३% खर्च योजना, विमा, पेंशन, एसटी-रेल्वे पास इ. योजनांचा लाभ घेता येईल. स्वावलंबन कार्ड मिळवून देणे तसेच आरोग्यविषयक सेवा देणे या उद्देशाने जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करण्यात येणार आहे.

दिव्यांगांसाठी याप्रकारचे संकेतस्थळ असावे, ही माझी इच्छा होती. त्याला प्रतिसाद देत सर्वप्रथम बीड जिल्ह्यातील समाज कल्याण व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. हा प्रयोग राज्यभर राबविला जाईल. सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत विभागाची प्रत्येक योजना पोहचावी हा प्रयत्न राहील, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

संकेतस्थळाचे नाव - 'दिव्यांगसाथी'

संकेतस्थळाची लिंक - http://divyangsathizpbeed.com

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.