ETV Bharat / city

Minister Bungalow Renovation: शिंदे सरकारमधील मंत्र्यांची बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधींची उधळपट्टी

वादग्रस्त शिंदे सरकारमधील मंत्र्यांचे बंगला नूतनीकरण (bungalow renovation Controversy in Shinde govt) चांगलेच वादात सापडले आहेत. अडीच वर्षांपूर्वी बनवलेल्या बंगल्यांवर पुन्हा कोट्यवधींची उधळपट्टी (Bungalow Renovation waste of crores) त्यांनी सुरू केली आहे. महागाईने सर्वसामान्य त्रस्त असताना नागरिकांचे पैसे अशा प्रकारे खर्च करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. (minister bungalow renovation Controversy)

Minister Bungalow Renovation
Minister Bungalow Renovation
author img

By

Published : Oct 3, 2022, 3:41 PM IST

Updated : Oct 3, 2022, 5:40 PM IST

मुंबई : वादग्रस्त शिंदे सरकारमधील मंत्र्यांचे बंगला नूतनीकरण (bungalow renovation Controversy in Shinde govt) चांगलेच वादात सापडले आहेत. अडीच वर्षांपूर्वी बनवलेल्या बंगल्यांवर पुन्हा कोट्यवधींची उधळपट्टी (Bungalow Renovation waste of crores) त्यांनी सुरू केली आहे. महागाईने सर्वसामान्य त्रस्त असताना नागरिकांचे पैसे अशा प्रकारे खर्च करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. (minister bungalow renovation Controversy)

शिंदे सरकारमधील मंत्र्यांचे बंगला नूतनीकरण वादात सापडण्याची शक्यता, विरोधक तर बोलणारच

नव्या-कोऱ्या बंगल्याचेही नूतनीकरण- राज्य सरकार आर्थिक तंगीत असताना शिंदे सरकारकडून वारेमाप घोषणा केल्या जात आहेत. तर दुसरीकडे मंत्रिमंडळातील १८ मंत्र्यांपैकी अनेकांनी नव्या कोऱ्या आणि अडीच वर्षांपूर्वी नूतनीकरण झालेल्या बंगल्याची पुन्हा दुरुस्ती करण्याचा धडाका सुरू केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबतचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असताना बंगल्यांच्या दुरुस्ती कामाला वेग आला आहे.

बंगल्याची डागडूगी करताना कारागीर
बंगल्याची डागडूगी करताना कारागीर

सामंताच्या बंगल्यात भुमरेंना येईना झोप - मागील मविआ सरकारच्या काळात रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांना मंत्रालयासमोरील ब्रम्हगिरी बंगला देण्यात आला होता. बंगला घेण्यापूर्वी ब्रम्हगिरीची डागडुजी केली. लाखो रुपये त्यावर खर्च केले. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने अडीच वर्षात मविआ सरकार कोसळले आणि भाजपच्या मदतीने शिंदे सरकार सत्तेवर आले. सत्तेवर येताच मंत्री भुमरेंनी जुना बंगला पुनर्बांधणीसाठी काढून तत्कालीन उच्च व शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा रत्नसिंधू बंगला ताब्यात घेतला. सामंत यांनी कोट्यवधी रुपये यावर खर्च करून आलिशान हा बंगला बनवला. परंतु, या बंगल्यातही भुमरे यांना झोप लागत नाही. विशेष म्हणजे सामंत यांनी अडीच वर्षात वापरलेली खुर्ची देखील भुमरे वापरत नाहीत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच दसरा मेळाव्यानंतर अंतर्गत बदल पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री भुमरे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. आधीच ब्रम्हगिरीवर सुमारे दीड ते दोन कोटी रुपये यावर खर्च अपेक्षित असताना सामंताच्या बंगल्यावर पुन्हा खर्च कशाला, असा सवाल उपस्थित केला जातो आहे.

शंभूराजे देसाईंना हवाय फर्निचरराईज बंगला - माजी मंत्री वर्षा गायकवाड यांचा बंगला नवे मंत्री शंभूराजे देसाई यांना देण्यात आला आहे. वर्षा गायकवाड यांनी बंगल्याची डागडुजी करत शिक्षण विभागाच्या कामाला प्राधान्य दिले होते. मंत्री शंभूराज देसाई यांना मात्र या बंगल्याला पूर्णतः फर्निचर कोस्टींग असे सुशोभिकरण हवे आहे. महागडे फर्निचर वापरण्याच्या सक्त सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पाठीच्या कण्याला (बॅकपेन) त्रास होणार नाही, अशी आरामदायी खुर्ची देखील आणण्याचे मंत्र्यांचे आदेश आहेत. मंत्र्यांच्या आदेशामुळे अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या डीलर्सना संपर्क साधण्याचे काम सुरू आहे.

मंत्री महोदयांची जुन्या बंगल्यांकडे पाठ- दरम्यान, सरकार बदलले की मंत्र्यांना चकचकीत बंगले आणि दालने हवी असतात. दोन वर्षांपूर्वी नुतनीकरण झालेले बंगले असले तरी एका मंत्र्यांने वापरलेला बंगला, दालन नव्या मंत्र्यांना नकोच असतात. शिवसेनेत बंडखोरी करत सुरत गाठलेल्या शिंदे गटावर '५० खोके, एकदम ओके' असा ठपका विरोधकांनी ठेवला. विधानभवनासह राज्याच्या कानाकोपऱ्यात ही एकच घोषणा चर्चेत आहे. ५० खोके घेतले का? हा संशोधनाचा विषय आहे.

Last Updated : Oct 3, 2022, 5:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.