मुंबई - मुंबई ते नवी मुंबई वॉटर टॅक्सीची ( Mumbai To New Mumbai Water Taxi ) सर्व तयारी पूर्ण झाली आहे. ही सेवा आता लोकांसाठी खुली करण्यासाठी केवळ औपचारिकता बाकी आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच राज्यांच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत व्यस्त ( Pm Narendra Modi In Election ) आहे. त्यामुळे अद्यापही वॉटर टॅक्सी सुरु झाली नसल्याची खंत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ( Aslam sheikh On Pm Narendra Modi ) व्यक्त केली आहे.
अस्लम शेख म्हणाले की, वॉटर टॅक्सी सेवा ( Aslam sheikh On Water Taxi Project ) लोकांसाठी खुली करण्यासाठी केवळ औपचारिकता बाकी आहे. मात्र, नरेंद्र मोदी यांचा वेळ उद्घाटनासाठी मिळत नसल्याने अद्याप पर्यंत वॉटर टॅक्सी सुरू करण्यात आली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचार सभेत व्यस्त आहेत. मोदी यांनी टॅक्सीच्या उद्घाटनाला प्राथमिकता द्यायला हवी होती. ती त्यांच्याकडून देण्यात आलेली नाही. वॉटर टॅक्सी सेवेची लोकार्पण करण्यासाठी संपूर्ण तयारी झालेली आहे. मग आता का थांबायचे?, असा पवित्राही शेख यांनी घेतला आहे.
राज्य सरकार विरुद्ध केंद्र पुन्हा संघर्ष?
वॉटर टॅक्सी प्रकल्प सुरू करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि आणि सिडको या तीनही विभागाचा हातभार आहे. वॉटर टॅक्सीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे यासाठी केंद्रीय नौकानयन मंत्रालयाने हस्तक्षेप केला होता. त्यानंतर पंतप्रधानांच्या उपस्थितीत या सेवेचे लोकार्पण केले जाणार होते. मात्र, पंतप्रधानांनी वेळ दिला नसल्याने या सेवेचे लोकार्पण लांबणीवर पडत आहे. मुंबईचे पालकमंत्री आणि बंदरे विकास मंत्री अस्लम शेख नी वॉटर टॅक्सी उद्घाटन उद्या करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार आणि केंद्र सरकार, वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत ( Mahavikas Aghadi Vs Central Government ) नाही.