ETV Bharat / city

मालाड मालवणी इमारत दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत - 4 लाख मदत मालाड इमारत दुर्घटना

मालाड मालवणी येथील ओल्ड कलेक्टर कंपाऊंड भागातील गेट क्रमांक पाच येथील तळमजला अधिक २ प्रकारच्या एका इमारतीचा वरचा मजला गुरुवारी बाजुच्या घरावर कोसळला. घटना समजताच अग्निशमन दल, महापालिका कामगार, पोलीस यांच्यासह स्थानिक नागरीकांच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त ठिकाणी तातडीने मदतीचे काम सुरु करण्यात आले.

malad
मालाड मालवणी इमारत दुर्घटना
author img

By

Published : Jul 17, 2020, 2:09 AM IST

मुंबई - मालाड मालवणी येथे इमारतीच्या वरचा मजला बाजुच्या घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधीत सर्व यंत्रणांशी संपर्क साधून दुर्घटनेची माहिती घेतली. आपत्तीग्रस्तांना सर्व प्रकारची मदत तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिल्या. दुर्घटनेमध्ये २ जणांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले. दुर्घटनेमध्ये इतर १३ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करुन त्यांना सोडण्यात आले आहे. तसेच दुर्घटनेतील सर्वांची सुटका करण्यात आली आहे.

मालाड मालवणी येथील ओल्ड कलेक्टर कंपाऊंड भागातील गेट क्रमांक पाच येथील तळमजला अधिक २ प्रकारच्या एका इमारतीचा वरचा मजला गुरुवारी बाजुच्या घरावर कोसळला. घटना समजताच अग्निशमन दल, महापालिका कामगार, पोलीस यांच्यासह स्थानिक नागरीकांच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त ठिकाणी तातडीने मदतीचे काम सुरु करण्यात आले. घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला. इतर सर्व १३ जणांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करुन त्यांना सोडण्यात आले.

मलबा उपसण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. या सर्व घटनेची पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सविस्तर माहिती घेतली. दुर्घटनाग्रस्तांना चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत. तसेच त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. त्याचबरोबर इमारतीच्या उर्वरित भागातील घरांचीही इतरत्र तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी त्यांना मदत करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना तातडीने मदत उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या. त्यानुसार मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये मदत देण्यात येणार असून, बाधीत कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीमधून मृतांच्या कुटुंबीयांना अतिरिक्त मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याबाबत जिल्हा प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.