ETV Bharat / city

'असा' असेल वरळीतील बीडीडीवासियांचा 'फ्लॅट', 22 मजल्यांचे पॉश टॉवर्स

गेल्या अनेक पिढ्या वरळी बीडीडी चाळीत 160 चौरस फुटांच्या घरात राहणारे बीडीडीवासीय लवकरच टॉवरमध्ये राहायला जाणार आहेत.

वरळी बीडीडी चाळ
असा असेल वरळीतील बीडीडीवासीयांचा 'फ्लॅट', 22 मजल्यांचे पॉश टॉवर्स
author img

By

Published : Aug 10, 2020, 9:06 AM IST

मुंबई - गेल्या अनेक पिढ्या वरळी बीडीडी चाळीत 160 चौरस फुटांच्या घरात राहणारे बीडीडीवासीय लवकरच टॉवरमध्ये राहायला जाणार आहेत. तेही 500 चौ फुटाच्या घरात. वरळीत सॅम्पल फ्लॅट देखील तयार आहेत. पण कोरोनाच्या सावटामुळे हा फ्लॅट रहिवाशांना पाहण्यासाठी खुला करण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने लांबणीवर टाकलाय.

ना.म. जोशी, नायगाव आणि वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकासाचे काम म्हाडाच्या माध्यमातून सुरू आहे. लॉकडाऊनमुळे या कामाला ब्रेक लागला होता. पण आता काम पुन्हा वेग पकडणार आहे. त्याचवेळी वरळीतील बीडीडीवासियांचा फ्लॅट नेमका कसा असेल हे दाखवण्यासाठी मुंबई मंडळाने वरळीतील जांबोरी मैदानातील पाण्याच्या टाकीजवळ एक सॅम्पल फ्लॅट बांधलाय. हा फ्लॅट मार्चमध्ये तयार झाला असून एप्रिलमध्ये या फ्लॅटचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा म्हाडाने निर्णय घेतला होता. पण कोरोना-लॉकडाऊनमुळे हे उद्घाटन रखडले आहे.

आता अनलॉकमध्ये मात्र बीडीडीवासियांना उत्सुकता लागली आहे, ती फ्लॅट पाहण्याची. त्यामुळे म्हाडाने सॅम्पल फ्लॅट पाहण्याची परवानगी रहिवाशांना द्यावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र कोरोनाची भीती लक्षात घेता ही मागणी मान्य होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती मुंबई मंडळातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. अशावेळी हा फ्लॅट कसा असेल, याची सविस्तर माहिती एका अधिकाऱ्याने दिली. हा 500 चौरस फुटांचा 2 बीएचके फ्लॅट असणार आहे. प्रशस्त हॉल, एक बेडरूम, एक मास्टर बेडरूम आणि किचन असे हे घर असेल. दोन बाथरूम-टॉयलेट असणार आहे.

संपूर्ण इमारतीचे बांधकाम भूकंपाशी समाना करू शकेल असे असेल, तर डिझाइन मुंबई आयआयटी मान्यताप्राप्त असणार आहे. 22 मजल्याचे हे टॉवर असणार आहेत. पहिले तीन मजले पार्किंगसाठी असतील. प्रत्येक मजल्यावर 6 ते 8 फ्लॅट असतील. खिडक्या गंज लागणार नाहीत अशा असतील. आग लागल्यास किमान दोन तास तग धरतील असे दरवाजे असतील. तर एक पॅसेंजर लिफ्ट आणि एक स्ट्रेचर लिफ्ट असेल. बाकी सर्व चांगल्या सुविधा देण्याबरोबरच बांधकाम गुणवत्तापूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.