ETV Bharat / city

मोठी घोषणा : शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने मिळणार कर्ज

तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा अजित पवार यांनी केली. एपीएमसीच्या बळकटीकरणासाठी २ हजार कोटींच्या योजनेची घोषणाही अर्थमंत्र्यांनी यांनी यावेळी केली.

Ajit Pawar
अजित पवार
author img

By

Published : Mar 8, 2021, 2:44 PM IST

मुंबई - कोरोना काळात उद्योग सेवा क्षेत्रात घट झाली आहे. मात्र, कृषी क्षेत्रात ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ व्हावी म्हणून सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले.

तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा अजित पवार यांनी केली. एपीएमसीच्या बळकटीकरणासाठी २ हजार कोटींच्या योजनेची घोषणाही अर्थमंत्र्यांनी यांनी यावेळी केली. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून राज्य सरकार भक्कमपणे शेतकऱ्यांच्या मागे उभे असल्याचे अर्थमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा-महा अर्थसंकल्प २०२१ : व्यापाऱ्यांवर कोणतेही नवे कर लादू नयेत - फत्तेचंद रांका

शेती-पूरक व्यवसायांसाठी विशेष तरतुदी

  • मस्त्यव्यवसायासाठी विशेष तरतूद.
  • पशुपालनासाठी विशेष तरतूद.
  • बर्ड फ्लू सारख्या रोगांना आळा घालण्यासाठी जैव प्रयोगशाळा उभारणार.
  • दुग्ध व मस्त्य योजनांसाठी ३,२७४ कोटी रुपयांची तरतूद.
  • रेशीम उद्योगासाठी चिखलठाणा येथे विशेष केंद्र.
  • शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी प्रयत्न.
  • महात्मा ज्योतिराव फुले योजनेंतर्गत १९,९२९ कोटी रुपयांची रक्कम सुमारे ३१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करण्यात आली.
  • ४२ हजार कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप करण्यात आले.
  • तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजाने पीककर्जाची तरतूद.
  • कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी चार वर्षांमध्ये २ हजार कोटी रुपयांची तरतूद.
  • कृषीपंप जोडणी धोरणासाठी महावितरणाला १,५०० कोटी रुपये प्रतिवर्षी देणार.
  • विकेल ते पिकेल धोरणासाठी २,१०० कोटी रुपयांची विशेष तरतूद.
  • 'मॅगनेट' प्रकल्पासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद.
  • अमरावतीमध्ये अत्याधुनिक संत्रे प्रकिया प्रकल्प स्थापन करणार.

हेही वाचा-राज्य शासनाने सर्व स्थानिक कर रद्द करावेत; जळगावातील व्यापाऱ्यांची अर्थसंकल्पाकडून अपेक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.