मुंबई- उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी 14 मार्च रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्ग, ट्रान्स हार्बर मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. तर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मेगाब्लॉक नसणार आहे.
कुर्ला-वाशी मेगाब्लॉक-
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी 11.10 वाजता ते सायंकाळी 4. 10 वाजेपर्यत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकावर येणाऱ्या हार्बर मार्गावरील पनवेल/ बेलापूर/ वाशी अप आणि डाऊन मार्गावरील लोक सेवा रद्द करण्यात येणार आहे. या ब्लॉगदरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नयेत, म्हणून पनवेल ते कुर्ला आणि कुर्ला ते सीएसएमटीसाठी विशेष लोकल गाड्या कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 8 वरून चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आलेला आहे. याब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत मध्य रेल्वेचे मुख्य मार्गावर प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहेत.
ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक-
मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-वाशी रेल्वे स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. याब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशी अप आणि डाऊन लोकल सेवा ब्लॉक दरम्यान बंद राहतील. वांद्रे /गोरेगाव ते सीएसएमटी अप आणि डाऊन लोकल सेवा ब्लॉक दरम्यान बंद राहतील.
पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगाब्लॉक-
पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी रविवारी मरीन लाईन्स ते माहीम रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. हा ब्लॉक सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत असणार आहे. या ब्लॉक कालावधीत मरीन लाईन्स ते माहीम दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकादरम्यान जलद मार्गावरील फलाट नसल्यास कारणाणे येथे लोकल सेवा थांबणार नाही.
मध्य रेल्वेच्या पॉवरब्लॉक रद्द-
मध्य रेल्वेवर कल्याण-कसारा विभागातील खडवली-वाशिंद, आसनगाव-आटगाव येथे पायाभूत सुविधेसाठी रविवारी रात्री 2 ते सकाळी 7.25 वाजेपर्यंत पॉवरब्लॉक घेण्यात आलेला होता. मात्र मध्य रेल्वेने काही कारणास्तव पॉवर ब्लॉक रद्द करण्यात आलेला आहे.
हेही वाचा- खान्देशातील सुपुत्राचा साहित्य अकादमीकडून सन्मान; तहसीलदार आबा महाजन यांच्या लघुकथा संग्रहाला बालसाहित्य पुरस्कार!
मुंबई: रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक - mumbai news
उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी 14 मार्च रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
![मुंबई: रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक Megablocks on Central and Western Railway lines on Sunday IN Mumbai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10987014-161-10987014-1615582241059.jpg?imwidth=3840)