ETV Bharat / city

मुंबईत रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर असणार मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील माटुंगा - मुलुंड अप व डाउन जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावरील मानखुर्द - नेरुळ रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गांवर मरीन लाइन्स ते माहीम दरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.

रेल्वे मेगाब्लॉक
रेल्वे मेगाब्लॉक
author img

By

Published : Jun 25, 2021, 10:38 PM IST

मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर रविवारी २७ जून २०२१ रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील माटुंगा - मुलुंड अप व डाउन जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावरील मानखुर्द - नेरुळ रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गांवर मरीन लाइन्स ते माहीम दरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान अप व डाउन जलद मार्गावर सकाळी ११. ०५ ते संध्याकाळी ४.०५ दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी मुंबईहून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.४४ या दरम्यान सुटणाऱ्या जलद सेवा माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील व माटुंगा ते मुलुंड दरम्यान त्यांच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील. या गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील आणि नियोजित वेळापत्रकापेक्षा १५ मिनिटे उशीराने गंतव्यस्थानी दाखल होतील. तर सकाळी १०.४६ ते दुपारी ३.२६ या वेळेत ठाणे येथून सुटणाऱ्या जलद सेवा मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि आपापल्या निर्धारित स्थानकांवर थांबतील. पुढे या जलद सेवा माटुंगा येथे अप जलद मार्गावर पुन्हा वळविल्या जातील आणि नियोजित वेळापत्रकापेक्षा १५ मिनिटे उशीराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

हार्बर मार्गवरील मेगाब्लॉक

हार्बर मार्गावरील मानखुर्द ते नेरूळ रेल्वे स्थानकाच्या अप व डाउन मार्गावर सकाळी ११.१५ ते संध्याकाळी ४.१५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान डाउन हार्बर मार्गावर सीएसएमटी मुंबई येथून सकाळी १०.१८ ते दुपारी ३.१६ दरम्यान पनवेल, बेलापूर, वाशी करीता सुटणाऱ्या आणि अप हार्बर मार्गावर पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी १०.४५ ते दुपारी ३.४१ या वेळेत सीएसएमटी मुंबई करीता सुटणाऱ्या सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत प्रवाशांची गैरसोय होणार नाही यासाठी सीएसएमटी ते मानखुर्द दरम्यान विशेष लोकल सेवा चालविण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावरील मरीन लाइन्स ते माहीम स्थानकांदरम्यान धीम्या मार्गवर सकाळी १०. ३५ ते दुपारी ३. ३५ वाजेपर्यत जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान रेल्वेरूळ, सिंग्णल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यासह विविध देखभाल दुरुस्तीची काम केली जाणार आहे. तर मरीन लाइन्स ते माहीम दरम्यान धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळविण्यांत येणार आहे. तर याब्लॉक कालावधीत महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड रेल्वे स्थानकावर लोकल सेवा थांबणार नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.