ETV Bharat / city

उद्या ट्रान्सहार्बर पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक तर, या मार्गावर मेगाब्लॉक नाहीत! - मुंबई लोकल ट्रेन मेगा ब्लॉक बातमी

उद्या ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे आणि ऐरोली स्थानकादरम्यान सकाळी 11.10 ते सायंकाळी 4. 10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.  मेट्रोसाठी आरएच गर्डर्स टाकण्यासाठी ठाणे आणि ऐरोली स्थानकादरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉक कालावधीत डाऊन हर्बल मार्गावर ठाणे येथून सकाळी 4.40 वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलकरिता सुटणारी आणि पनवेल/नेरुळ/वाशी येथून सकाळी 9.48 ते सायंकाळी 4.19 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

megablock on transharbour western railway line on sunday in mumbai
ट्रान्सहार्बर पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
author img

By

Published : Apr 30, 2022, 5:44 PM IST

मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाची दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी दर रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येतो. मात्र, उद्या महाराष्ट्र आणि कामगार दिनी मेगाब्लॉकला रेल्वेने सुट्टी दिली आहे. मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी कोणताही ब्लॉक नसेल, तर पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन ब्लॉक न घेता रात्र काली ब्लॉक घेण्यात आलेला आहे. तर, फक्त पायाभूत कामासाठी ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक - मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, उद्या ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे आणि ऐरोली स्थानकादरम्यान सकाळी 11.10 ते सायंकाळी 4. 10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. मेट्रोसाठी आरएच गर्डर्स टाकण्यासाठी ठाणे आणि ऐरोली स्थानकादरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉक कालावधीत डाऊन हर्बल मार्गावर ठाणे येथून सकाळी 4.40 वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलकरिता सुटणारी आणि पनवेल/नेरुळ/वाशी येथून सकाळी 9.48 ते सायंकाळी 4.19 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान मुख्य मार्गावर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल गोरेगाव विभागांमधील हार्बर मार्गावरील कोणताही मेगाब्लॉक असणार नाही. या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आव्हान मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक - पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे रूट दुरुस्तीसाठी आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी रविवारी बोरीवली ते अंधेरी दरम्यान अप डाउन जलद मार्गावर शनिवारी-रविवारी च्या मध्यरात्री 11.15 ते रात्री 3.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या पाच तासांच्या ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील सर्व लोकल तेव्हा बोरीवली ते अंधेरी स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर थांबवतील. याशिवाय रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसकालीन कोणताही मेगाब्लॉक नसणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.