ETV Bharat / city

MNS Leader Meeting In Mumbai : शिवतीर्थावर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक - मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक

मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसे आग्रही आहे. राज ठाकरे यांनी दिलेली मुदत आज संपणार आहे. मनसेची पुढील भूमिका ठरवण्यासाठी राज ठाकरे यांनी निवडक पदाधिकाऱ्यांची आज बैठक ( MNS Leader Meeting In Mumbai ) बोलावली. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होतो, हे पाहणे महत्वाचे आहे.

MNS Leader Meeting In Mumbai
शिवतीर्थावर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक
author img

By

Published : May 3, 2022, 9:01 AM IST

मुंबई - मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसे आग्रही आहे. राज ठाकरे यांनी दिलेली मुदत आज संपणार आहे. मनसेची पुढील भूमिका ठरवण्यासाठी राज ठाकरे यांनी निवडक पदाधिकाऱ्यांची आज बैठक ( MNS Leader Meeting In Mumbai ) बोलावली. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होतो, हे पाहणे महत्वाचे आहे.

दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भोंगे उतरवण्याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. 3 मे पर्यंत भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम दिला होता. उद्यापासून मुदत संपणार आहे. मशिदीवरील भोंगे न उतरवल्यास कोणाचेही एकूण घेणार नाही. मशिदींसोमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करू, असा इशारा दिला आहे. राज्यातील राजकारण यामुळे तापले आहे.

मनसे पुढील भूमिका जाहीर करणार - अक्षय तृतीयाच्या निमित्ताने मनसेकडून राज्यभरात महाआरतीचे आयोजन केले होते. मात्र सोमवारी राज ठाकरे यांनी महाआरती रद्द करण्याच्या सूचना दिल्या. तसेच लवकरच ट्विटरच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट करू असे जाहीर केले. आज भोंग्याबाबत मनसेने दिलेली मुदत संपणार आहे. त्यामुळे पुढील भूमिका ठरवण्यासाठी मनसेच्या काही निवडक पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, यशवंत किल्लेदार आदी पदाधिकाऱ्यांना बैठकीला बोलवण्यात आले आहे. त्यामुळे मनसेच्या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार, हे पाहावे लागणार आहे.

शिवतीर्थासमोर पोलिसांचा बंदोबस्त - मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर गृहविभाग सतर्क झाला आहे. राज्यात आज ईद साजरी होत असल्याने अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. शिवाय राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थान बाहेरही पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - Raj Thackeray Speech Controversy: मनसेकडून महाआरती रद्द, तर राज ठाकरेंवर कारवाईची अनेकांची मागणी; वाचा दिवसभरात काय घडलं?

हेही वाचा - Ajit Pawar On Raj Thackeray : 'बोलणाऱ्याचे जेवढे वय, तेवढे पवार साहेबांचे राजकारणातील आयुष्य'; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.