मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमैया यांच्यात आरोप - प्रत्यारोपांचा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. आज राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन केलेल्या आरोपांची कागदपत्रे सुपूर्द केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतल्याने सोमैयांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Thane Bay Area : ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा; राज्याचा केंद्र सरकारला प्रस्ताव
भाजप नेते किरीट सोमैया यांनी कथित भ्रष्टाचाराचे आरोप करत महा विकास आघाडी सरकारला जेरीस आणले आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत घेत सोमैयावर आरोपांची सरबत्ती केली. किरीट सोमैया यांनी देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाने खंडणी उकळल्याचा आरोप राऊत यांनी आज केला. 211 प्रकरणांची चौकशी करावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांनी आज भेट घेतली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासोबत तब्बल पाऊण तास बैठक झाली. दरम्यान राऊत यांनी सोमैया यांच्यावरील आरोपांचे कागदपत्र मुख्यमंत्री ठाकरे यांना दिल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांनी या कागदपत्रांची दखल घेत तात्काळ चौकशी करावी. पोलिसांना तसे निर्देश द्यावेत, अशी सूचना गृहमंत्री वळसे पाटील यांना केल्याचे समजते. यामुळे सोमैया गोत्यात येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Sanjay Raut on Kirit Somaiya File : किरीट सोमैय्यांवरील आरोपांबाबतची फाईल मुख्यमत्र्यांकडे - संजय राऊत