ETV Bharat / city

MBBS Admission Scam : कोल्हापुरातील एससीएसईएस संस्थेत एमबीबीएस प्रवेश घोटाळा, 350 विद्यार्थ्यांची 65 कोटींची फसवणूक

वैद्यकीय महाविद्यालयाच्या ( College ) शिक्षण संस्था चालकावर ईडीनं कारवाई केली आहे. एससीएसईएसचे विद्यमान संचालक अरुण गोरे यांनी ईडीला दिलेल्या निवेदनात दावा केला आहे. की ते धर्मादाय शैक्षणिक ट्रस्टचे संचालक म्हणून रुजू झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या तक्रारी घेऊन नवीन मंडळाकडे संपर्क साधला होता.

ईडी कारवाई
ईडी कारवाई
author img

By

Published : Jul 25, 2022, 6:35 AM IST

मुंबई - कोल्हापुरातील श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे एससीएसईएस ( SCSES ) माजी कार्यकारी अध्यक्ष आणि अन्य आरोपींनी ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या महाविद्यालयातील प्रवेश घोटाळा समोर आला आहे. प्रवेशासाठी ( College admission ) वैद्यकीय इच्छुकांकडून 65 कोटींहून अधिक रक्कम 350 वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांकडून गोळा केली होती, असा दावा अंमलबजावणी संचालनालयाने मुंबई सत्र न्यायालयातील ( Mumbai Sessions Court ) विशेष पीएमएलए ( PMLA ) कोर्टात दाखल केलेल्या आरोप पत्रात म्हटले आहे.

फसवणूक प्रकरणाची चौकशी - ईडीच्या म्हणण्यानुसार एमबीबीएस ( MBBS ) अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यासाठी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सकडून आवश्यक परवानगी नसल्याची माहिती असूनही SCSES ने रक्कम गोळा केली होती. ईडी SCSES द्वारे वैद्यकीय इच्छुकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणाची चौकशी करत आहे. ज्यामध्ये ट्रस्टचे माजी कार्याध्यक्ष महादेव देशमुख आणि त्यांचे बंधू आप्पासाहेब तत्कालीन सचिव यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील 3 आरोपींना मागील आठवड्यात 1 लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी महादेव देशमुख ( Mahadev Deshmukh ) सध्या न्यायालयीन कोठडीत ( Judicial Custody ) आहे.

350 विद्यार्थ्यांची फसवणूक - आरोपपत्रानुसार महादेव देशमुख याने अन्य आरोपींच्या संगनमताने 2011 ते 2016 या कालावधीत सुमारे 350 भोळ्या विद्यार्थ्यांची फसवणूक करून इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च या महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याच्या बहाण्याने सुमारे 65.70 कोटी रुपये उकळले. IMSR, SCSES द्वारे चालवले जात आहे.

ईडीचा दावा - हा निधी कथितपणे रोख स्वरूपात गोळा करण्यात आला आणि रुग्णालयाचे उत्पन्न म्हणून दाखवण्यात आले आणि सोसायटी आणि महाविद्यालयांच्या 7 बँक खात्यांद्वारे आर्थिक प्रणालीमध्ये एकत्रित केले गेले, असे त्यात म्हटले आहे. पगार, प्रक्रिया शुल्क, बांधकाम देयके, वैद्यकीय उपकरणे खरेदी इत्यादींच्या नावाखाली ही रक्कम पुढे ढकलण्यात आली होती. एकतर आरोपींच्या वैयक्तिक बँक खात्यात समाकलित करण्यात आली होती, किंवा त्यांच्याकडून रोख रक्कम काढण्यात आली होती असा दावा ईडीने केला आहे. गुन्ह्यातून मिळालेली रक्कम मालमत्तेच्या खरेदीसाठी किंवा वैयक्तिक वापरासाठी वापरली गेली असे त्यात म्हटले आहे.

निवेदनात बोगस आश्वासन - दरम्यान एससीएसईएसचे विद्यमान संचालक अरुण गोरे यांनी ईडीला दिलेल्या निवेदनात दावा केला आहे. की ते धर्मादाय शैक्षणिक ट्रस्टचे संचालक म्हणून रुजू झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या तक्रारी घेऊन नवीन मंडळाकडे संपर्क साधला होता. यापूर्वीच्या संचालक मंडळाने सुमारे 750 विद्यार्थ्यांकडून रोख रक्कम घेऊन त्यांना प्रवेशाचे बोगस आश्वासन दिल्याचे गोरे यांच्या निवेदनात म्हटले आहे. आरोपपत्रानुसार त्यांनी त्या विद्यार्थ्यांची यादी आणि 720 विद्यार्थ्यांकडून जमा केलेल्या रोख रकमेचा तपशील सादर केला आहे.

विद्यार्थी अनुक्रमे तत्कालीन प्रशासकीय अधिकारी व वरिष्ठ लिपिक मारुती शंकर शितोळे व किरण धुमाळ यांच्याकडे रोख रक्कम जमा करायचे. या दोघांनी जमा केलेली रक्कम देशमुख बंधूंना द्यायची आणि तत्कालीन सचिव मोहम्मद शाद सिद्दीकी यांनी गोरे यांचा आरोप केला आहे.

हेही वाचा - Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या 'शिवसंवाद'मुळे बंडखोर आमदारांचे धाबे दणाणले?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.