ETV Bharat / city

एमबीबीएसच्या परीक्षार्थींना मोठा दिलासा; प्रवेशपत्रावर प्रवासाची मुभा

author img

By

Published : Jun 11, 2021, 10:41 PM IST

परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नयेत, म्हणून विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र हेच ई-पास म्हणून गृहितधरून प्रवासात मुभा देण्याचे आदेश मदत व पुनर्विकास विभागाकडून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

मुंबई - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे राज्यभरात वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा १० जूनपासून घेण्यात येत आहेत. या परीक्षा राज्यातील १७३ परिक्षा केंद्रांवर घेण्यात येत आहे. त्यामुळे, परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नयेत, म्हणून विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र हेच ई-पास म्हणून गृहितधरून प्रवासात मुभा देण्याचे आदेश मदत व पुनर्विकास विभागाकडून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे.

हेही वाचा - मुंबई शहरासह उपनगरातील काही भागांत १३-१४ जून दरम्यान हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा

विद्यार्थ्यांना मिळाला दिसला

आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यातर्फे आयोजित होणाऱ्या आरोग्य विज्ञानाच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षांच्या परिक्षांचे आयोजन १० जून २०२१ ते ३० जून २०२१ या कालावधीत राज्यातील १७३ परिक्षा केंद्रांवर होणार आहे. ४ जून २०२१ रोजी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना म्हणून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यांची रुग्णसंख्या लक्षात घेता निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी अडचणी येऊ नयेत म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र हेच ई-पास म्हणून गृहीतधरून प्रवासात मुभा देण्याचे आदेश मदत व पुनर्विकास विभागाकडून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

परीक्षार्थींना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आरटीपीसीआर कोरोना चाचणी अहवाल निगटिव्ह असणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी परीक्षापूर्वीच विद्यार्थ्यांनीही कोरोना चाचणी करून आपला रिपोर्ट परीक्षा केंद्रावर परिक्षेच्या दिवशी जमा करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल नसले त्यांनी परिक्षेच्या दिवशी अँटिजेन टेस्ट करून त्याचा रिपोर्ट नेगटिव्ह आल्यावर परीक्षा देता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा कोरोना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आहे, त्या विद्यार्थ्यांला परीक्षा केंद्रावर परीक्षा देता येणार नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेनंतर वेगळी परीक्षा घेतली जाणार आहे.

हेही वाचा - मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत चढ-उतार सुरूच, 696 कोरोनाबाधितांची नोंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.